Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रामायण'मधून हॉलिवूडच्या 'या' संगीतकाराचं बॉलिवूडमध्ये पदार्पण? ए आर रहमानसोबत करणार काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 13:49 IST

रामायणावर आधारित या सिनेमात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत आहे तर साई पल्लवी सीतामातेची भूमिका साकारत आहे.

'दंगल'फेम दिग्दर्शक नितेश तिवारी आगामी 'रामायण' (Ramayan) सिनेमा घेऊन येत आहेत. रामायणावर आधारित या सिनेमात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत आहे तर साई पल्लवी सीतामातेची भूमिका साकारत आहे. नितेश तिवारींचा हा बिग बजेट प्रोजेक्ट आहे. त्यामुळे या सिनेमासाठी मेकर्स कोणतीच कसर सोडत नाहीयेत. सिनेमासंबंधित नवीन अपडेटनुसार हॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार हॅन्स झीमर (Hans Zimmer) 'रामायण' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.

पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, नितेश तिवारी आणि निर्माते नमित मल्होत्रा दोघांनी ऑस्कर विजेते लायन किंग, इंटरस्टेलार फेम संगीतकार हॅन्स झिमर यांना विचारणा केली आहे. हॅन्स झिमर स्वत: या प्रोजेक्टसाठी काम करण्यास उत्सुक आहेत. विशेष म्हणजे संगीतकार ए आर रहमान (A R Rahman) आधीपासूनच या 'रामायण'साठी फायनल झाले आहेत. त्यामुळे हॅन्स झिमर आणि रहमान पहिल्यांदाच एकत्र येण्याची शक्यता आहे. जर हे शक्य झालं तर हॅन्स झिमर यांचं हे बॉलिवूडमध्ये पदार्पण असेल. 

'रामायण'च्या शूटिंगला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. अरुण गोविल दशरथाच्या भूमिकेत असून लारा दत्ता कैकयी आहे. त्यांचा सिनेमातील लूकही समोर आला आहे. तर रणबीर कपूर, साई पल्लवी काही दिवसातच शूटिंगसाठी जॉईन होणार आहेत. शिवाय सनी देओल, यश यांचीही महत्वाची भूमिका आहे.

टॅग्स :रामायणरणबीर कपूरए. आर. रहमानसंगीतहॉलिवूड