Join us

Holi Celebration: बॉलीवूड सेलिब्रिटींनी दिल्या होळीच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 17:16 IST

होळीच्या सणाला बॉलीवूड मधील सेलेब्रिटीनी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. होळी सुरक्षितपणे खेळा असे आवाहन त्यांच्या चाहत्यांना ते करत आहेत.

ठळक मुद्देह्रितिक रोशनने त्याच्या फॅन्सना शुभेच्छा देताना म्हटले आहे की, होळी तुमच्या आयुष्यात आंनद, शांतता आणि प्रेम प्रस्थापित करो हीच प्रार्थना... सगळ्या सुंदर लोकांना होळीच्या शुभेच्छा.

होळीचा सण म्हणजे आनंद, आरोग्य आणि संस्मरणीय क्षणांना रंगांनी न्हाऊ घालणे! होळी सेलिब्रेट करण्यासाठी वयाचे बंधन कधीच नसते. प्रत्येकजण या सणाचा आनंद लुटत असतो. रंगपंचमीच्या दिवशी सगळेजण आपआपसातील वैर विसरून एकमेकांना रंग लावून जुने राग, रोष विसरून जातात तर होळीला वाईटावर चांगल्याच गोष्टीचा विजय होतो असे म्हटले जाते. 

बॉलीवूड आणि होळी यांचे कनेक्शन खूपच जुने आहे. बॉलीवूडमधील होळी पार्ट्या तर पूर्वी फारच फेमस होत्या. कपूर फॅमिली होळीची पार्टी मोठ्या उत्सवात सगळ्या बॉलीवूड इंडस्ट्रीला द्यायचे. तसेच अमिताभ बच्चन देखील होळीला भव्य पार्टी द्यायचे. 

होळीच्या सणाला बॉलीवूड मधील सेलेब्रिटीनी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. होळी सुरक्षितपणे खेळा असे आवाहन त्यांच्या चाहत्यांना ते करत आहेत.

अक्षय कुमारने ट्वीट केले आहे की, ही होळी तुमच्या आयुष्यात अनेक रंगीबेरंगी रंग घेऊन येवो... तुम्हाला सगळ्यांना होळी आणि नावरोझच्या शुभेच्छा.

 

ह्रितिक रोशनने त्याच्या फॅन्सना शुभेच्छा देताना म्हटले आहे की, होळी तुमच्या आयुष्यात आंनद, शांतता आणि प्रेम प्रस्थापित करो हीच प्रार्थना... सगळ्या सुंदर लोकांना होळीच्या शुभेच्छा.

 

अनिल कपूरने देखील होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 माधुरी दीक्षित खुपच कमी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. तिने देखील ट्वीट करत सगळयांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने ट्विट मध्ये लिहिले आहे की, होळी तुमचे आयुष्य रंगीबेरंगी बनवो. होळीचा मनमुराद आनंद लुटा. पण स्वतःची काळजी घ्या.

 

 

टॅग्स :होळी 2023