Join us

HOLI 2020: भांग पिऊन या अभिनेत्रीने घातला असा धिंगाणा, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 16:39 IST

होळी सेलिब्रेशनमध्ये ती इतकी मग्न होती की, तिला फक्त बेधुंदपणे थिरकत होती.

देशात सर्वत्रच रंगपंचमी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात सगळेच वस्त आहेत, अशातच आपले सेलिब्रेटी मंडळी तरी कसे मागे राहणार. बुरा ना मानो होली है म्हणत असाच जल्लोष अभिनेत्री शिल्पा शेट्टीने केला आहे. रंगपंचमी तिने मोठ्या उत्साहात सेलिब्रेट केली. सेलिब्रेशनचा व्हिडीओही तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. विशेष म्हणजे तिने नागिन डान्स केल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळतंय. 

 

व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे शिल्पाने भांग प्यायली असून त्या नशेत ती बेधुंद थिरकत असल्याचे पाहायला मिळतंय. हा व्हिडीओ तिचा पती राज कुंद्रानेही चाहत्यांसह शेअर केला आहे. भांगेच्या नशेत नागिन डान्स करणाऱ्या शिल्पाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

शिल्पासाठी यंदाचे होळी सेलिब्रेशन तसे खासच आहे, कारण नुकतेच तिच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे. वयाच्या 44 व्या वर्षी शिल्पा दुस-यांदा आई झाली. 15 फेब्रुवारीला शिल्पाला मुलगी झाली. सरोगसीच्या माध्यमातून शिल्पाच्या मुलीचा जन्म झाला. शिल्पाने आपल्या मुलीचे नाव समिशा शेट्टी ठेवले आहे. कन्येच्या आगमनानंतर शिल्पाचे आयुष्यच पालटले आहे. तिचा आनंद ती वेळोवेळी सोशल मीडियावर शेअर करत असल्याचे नेहमी पाहायला मिळते,

टॅग्स :शिल्पा शेट्टीहोळी 2023