Join us

हिंदुस्तानी भाऊचं इंस्टाग्राम अकाउंट झालं सस्पेंड, हे आहे या मागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 14:03 IST

हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठकचे इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर हिंदुस्तानी भाऊ नावाने प्रसिद्ध असलेल्या विकास पाठकचे इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. काही भडकवणाऱ्या पोस्टमुळे त्याचे हे अकाउंट निलंबित करण्यात आले आहे. त्याचे हे अकाउंट बंद करण्यामागे लेखक पुनीत शर्मा याचा हात आहे. पुनीतने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती ज्यात त्याने हिंदुस्तानी भाऊविरोधात तक्रार केली होती. यावर एक्शन घेत इंस्टाग्रामने हिंदुस्तानी भाऊचं अकाउंट सस्पेंड केले.

हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठक सोशल मीडियावर आधीपासून प्रसिद्ध आहे पण तो जास्त लोकप्रिय बिग बॉस शोच्या तेराव्या सीझनमध्ये सहभागी झाल्यानंतर झाला. तो नेहमी सोशल मीडियावर देश आणि जगभरातील घटनांवर वेगवेगळे व्हिडिओ बनवून त्यावर आपलं मत व्यक्त करत असतो. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओवर पुनीत शर्माने निनावी तक्रार केली आणि इंस्टाग्रामने विकासचे अकाउंट सस्पेंड केले.

ही माहिती देत पुनीतने फेसबुकवर लिहिले की, 'उद्या आणखीन येतील फुलणाऱ्या कळ्या निवडणारे, माझ्यापेक्षा जास्त बोलणारे आणि ऐकणारे.

इंस्टाग्रामनुसार हे त्यांच्या माध्यमाच्या नियम आणि कायद्याच्या विरोधात आहे. विकास संजय दत्तचा खूप मोठा चाहता आहे. पण काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर करत संजय दत्तच्या कॅन्सरच्या वृत्ताला एक पब्लिसिटी स्टंट सांगितले होते. विकासचे म्हणणे होते की संजय दत्तवर देशातील खूप लोक प्रेम करतात. त्याचाच फायदा सडक 2 चित्रपटाचे निर्माते आणि कलाकार घेऊ इच्छित आहे. त्यामुळे कॅन्सरचे वृत्त पसरवत आहेत जेणेकरून लोकांकडून चित्रपटाला सहानुभूती मिळेल. विकासच्या या विधानावर काम्या पंजाबी, कुणाल कामरा यांसारख्या कित्येक लोकांनी मुंबई पोलिसांना विकारवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काही लोकांनी तर त्याला अटक करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :बिग बॉससंजय दत्त