Join us

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियाच्या कारला अपघात, ड्रायव्हर झाला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 15:17 IST

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक, संगीतकार व अभिनेता हिमेश रेशमिया याच्या कारला अपघात झाल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक, संगीतकार व अभिनेता हिमेश रेशमिया याच्या कारचा अपघात झाल्याचे सूत्रांकडून समजते आहे. हा अपघात मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर घडला आहे. या अपघातात हिमेश रेशमियाचा ड्रायव्हर राम रंजन गंभीर जखमी झाला आहे.

बॉलिवूडला प्रसिद्ध गायक, संगीतकार व अभिनेता हिमेश रेशमियाच्या कारला अपघात झाल्याचं समजतंय. हा अपघात मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झाला. एण्टरटेन्मेंट पोर्टल स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, या अपघातात हिमेश रेशमियाचा ड्रायव्हर राम रंजन गंभीररित्या जखमी झाला आहे. राम रंजन मुळचा बिहारचा आहे. हा अपघात कसा झाला आणि हिमेश रेशमिया कसा आहे, ही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

सध्या हिमेश रेशमिया सोनी वाहिनीवरील सुपर स्टार सिंगर या रिएलिटी शोचे परीक्षण करतो आहे. या शोमध्ये हिमेश सोबत अलका याग्निक व जावेद अलीदेखील परीक्षक आहेत. यापूर्वी हिमेश सारेगामापा लिटिल चैंम्‍प्‍स, द वॉयस ऑफ इंडिया किड्सचा देखील परीक्षक होता. हिमेश बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक व अभिनेता आहे. सलमान खानने हिमेश रेशमियाला बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला होता. त्यामुळे बऱ्याचदा सलमानला क्रेडीट देताना दिसतो. हिमेशने सलमान खानच्या जब प्यार किया तो डरना क्या चित्रपटातून पदार्पण केले होते.

रिएलिटी शोजच्या परीक्षणा व्यतिरिक्त हिमेश चित्रपटातही सक्रीय आहे. तो आगामी चित्रपट सूर्यवंशी व गुड न्यूजचा संगीत दिग्दर्शक आहे.

हिमेशने तेरा सुरूर, आप का सुरूर, कर्ज, रेडिओ, खिलाडी 786 यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. हिमेश रुपेरी पडद्यावर मैं जहां रहू चित्रपटातून अभिनयात कमबॅक करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश सेठी करणार आहेत.

टॅग्स :हिमेश रेशमियाअपघात