बॉलिवूडच्या इतिहासात सुपरहिट ठरलेला सिनेमा म्हणजे 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' (DDLJ). हा सिनेमा रिलीज होऊन बरीच वर्ष झाले. मात्र, त्याची लोकप्रियता आजही कायम आहे. शाहरुख खान, काजोल, अमरिश पुरी, फरिदा जलाल आणि हिमानी शिवपुरी असे अनेक दिग्गज कलाकार या सिनेमात झळकले होते. कलाकारांच्या उत्तम अभिनयामुळे हा सिनेमा पडद्यावर सुंदररित्या सादर झाला. मात्र, या सिनेमाचं चित्रीकरण सुरु असतांना यातील एका अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला होता.
''दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'' या सिनेमा महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली अभिनेत्री म्हणजे हिमानी शिवपुरी (Himani Shivpuri). उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या हिमानी यांचा 'डीडीएलजे'मधील भूमिकाही तितकीच गाजली. मात्र, हा सिनेमा शूट करत असतांना त्यांना मोठ्या दु:खाचा सामना करावा लागला. एकीकडे सिनेमाचं चित्रीकरण सुरु होतं. तर, दुसरीकडे त्यांच्या पतीचं निधन झालं होतं. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही भावनिक आठवण शेअर केली.
या सिनेमातील त्यांची आणि अनुपम खेर यांची केमिस्ट्री सगळ्यांनाच आवडली होती. त्यामुळे सिनेमातील क्लायमॅक्समध्ये त्यांचे काही सीन असणार होते. मात्र,त्याचेवळी त्यांच्या पतीचं निधन झालं. ज्यामुळे हे सीन शूट झाले नाहीत.
एकटीने केले पतीवर अंत्यसंस्कार
'मी डीडीएलजे चा क्लायमॅक्स शूट करण्यासाठी जात होते तेव्हाच मला फोन आला. पतीचं निधन झाल्याचं मला कळलं आणि मला मोठा धक्का बसला. सगळंच थांबल्यासारखं वाटलं. मी तातडीने शूट सोडून तिकडे गेले. मी एकटीनेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही केले. यानंतर अस्थी विसर्जनासाठी मी हरिद्वारला गेले," असं हिमानी म्हणाल्या.
पुढे म्हणाल्या, "मी आजही ते दिवस विसरु शकत नाही. माझ्या आयुष्यातला सर्वात भयानक काळ होता. तरी मी त्यातून सावरले आणि पुन्हा कामात व्यस्त झाले." दरम्यान, हिमानी यांनी 'डीडीएलजे'सोबतच हम आपके हैं कौन, हम साथ साथ हैं, याराना, बाल ब्रह्मचारी, बेकाबू, हिरो नंबर १, कोयला यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
Web Summary : While filming DDLJ, Himani Shivpuri faced immense grief with her husband's sudden demise. She balanced her professional commitments with personal tragedy, even performing his last rites alone, showcasing remarkable strength.
Web Summary : DDLJ की शूटिंग के दौरान, हिमानी शिवपुरी को पति के निधन का गहरा दुख हुआ। उन्होंने पेशेवर प्रतिबद्धताओं और व्यक्तिगत त्रासदी को संतुलित किया, यहां तक कि अकेले ही अंतिम संस्कार भी किया, जो उनकी उल्लेखनीय शक्ति को दर्शाता है।