Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोकांनी 'बाबूभय्या' हाक मारताच अक्षयने परेश रावल यांच्यासोबत काय केलं? व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 11:09 IST

हेरा फेरी सिनेमातील सर्वांचं लाडकं त्रिकूट पुन्हा एकत्र आलं असून अक्षयने परेश रावल यांच्यासोबत मस्ती केलीय

'हेरा फेरी' सिनेमा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता सिनेमा. 'हेरा फेरी' आणि 'फिर हेरा फेरी' या दोन्ही सिनेमांचा स्वतःचा एक चाहतावर्ग आहे. या दोन्ही सिनेमांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवलंय. परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांची भूमिका असणारा 'हेरा फेरी'चा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच 'हेरा फेरी'चं त्रिकूट एअरपोर्टवर स्पॉट झालं. त्यावेळी अक्षय कुमारनेपरेश रावल यांच्यासोबत केलेली एक छोटीशी कृती पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

अक्षय कुमारने परेश रावल यांच्यासोबत काय केलं?

झालं असं की, अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी एका आलिशान गाडीतून उतरत एअरपोर्टवर आले. त्यावेळी परेश रावल आणि सुनील शेट्टी गप्पा मारत होते. समोर असलेल्या मीडियाने तिघांना एकत्र पाहताच आनंद व्यक्त केला. परेश रावल यांना लोकांनी प्रेमाने 'बाबूभय्या बाबूभय्या' अशी हाक मारली. पण परेश रावल यांचं लक्ष नव्हतं. त्यावेळी अक्षय कुमारने परेश रावल यांच्या डोक्यावर हात ठेऊन त्यांचं डोकं मीडियाकडे केलं. अक्षय कुमारने असं करताच तो स्वतः हसलाच शिवाय परेश रावल यांनाही हसू आवरलं नाही.

'हेरा फेरी ३' लवकरच

'हेरा फेरी ३' च्या एकंदर चर्चांनंतर आता सिनेमाच्या  शूटिंगला सुरुवात झाली आहे. फरहाद सामजी या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. 'हेरा फेरी'चा पहिला भाग २००० मध्ये रिलीज झाला होता तर 'फिर हेरा फेरी' २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता. पहिला 'हेरा फेरी' येऊन २२ वर्ष झाली मात्र सिनेमाची क्रेझ अजुनही कायम आहे. आता पुन्हा एकदा बाबू भय्या, राजू आणि श्याम हे तिघेही पुन्हा चाहत्यांना हसवायला येत आहेत. सध्या तरी 'हेरा फेरी ३' चं शूटिंग जोरात सुरु आहे.

टॅग्स :अक्षय कुमारपरेश रावलसुनील शेट्टी