Hema Malini Post: बॉलिवूडचे ही-मॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र याचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.धर्मेंद्र यांनी आजवर अनेक सिनेमांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यांच्या जाण्याने कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. धर्मेंद्र यांच्या शेवटच्या काळात त्यांची मुले पत्नी हेमा मालिनींनी खंबीर साथ दिली. या दु:खातून त्यांचे कुटुंबीय देखील अजून सावरलेले नाहीत. अशातच धर्मेंद्र यांच्या आठवणीत हेमा मालिनींनी भावुक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेते धर्मेंद्र यांचं २४ नोव्हेंबर रोजी निधन झालं. त्यावेळी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर तिच्याबरोबरचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करीत हळहळ व्यक्त केली. मात्र, हेमा मालिनींनी त्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पतीच्या जाण्यानं त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, धर्मेंद्र यांच्या आठवणीत नुकतीच हेमा मालिनींनी डोळे पाणावणारी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय,"ते माझं सर्वस्व होते. एक प्रेमळ पती, आमच्या दोन्ही मुलींचे ईशा आणि अहाना यांचे लाडके वडील, मित्र, मार्गदर्शक, कवी, माझ्या जवळचा माणूस ,खरं तर ते माझ्यासाठी सर्वकाही होते. माझ्या चांगल्या वाईट काळात ते कायम सोबत राहिले. त्यांनी आपल्या आणि मैत्रीपूर्ण स्वभावाने माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना आपलंसं केलं. त्यांच्या मनात नेहमीच सर्वांप्रती प्रेम आणि आपलुकी असायची."
त्यानंतर त्यांनी म्हटलंय,"त्यांची प्रतिभा, लोकप्रियता असूनही त्यांच्या वागण्यातील नम्रतेमुळे ते इतरांपासून वेगळे असल्याचं जाणवायचं. चित्रपटसृष्टीतील त्यांची कारकिर्द आणि योगदानामुळे ते कायमच जिवंत राहतील. माझं वैयक्तिकरित्या खूप मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या जाण्याने आयुष्यात कधीही भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. वर्षानुवर्षे एकत्र राहिल्यानंतर, त्या खास क्षणांना पुन्हा जिवंत करण्यासाठी माझ्याकडे खूप आठवणी शिल्लक आहेत."अशा आशयाची पोस्ट हेमा मालिनींनी शेअर केली आहे. असं कॅप्शन देत त्यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत खास फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांची ही पोस्ट पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले आहेत.
धर्मेंद्र यांनी १९८० मध्ये हेमा मालिनींसोबत लग्न केलं. जवळपास ४५ वर्ष त्यांनी सुखाने संसार केला. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. धर्मेंद्र हेमा मालिनी यांच्या प्रेमात इतके वेडे झाले होते की, त्यांनी पहिली पत्नी प्रकाश कौर आणि चार मुले असतानाही दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला.
Web Summary : Hema Malini mourns Dharmendra's death, sharing a touching tribute. She remembers him as her everything: loving husband, father, friend, and guide, cherishing their years together.
Web Summary : हेमा मालिनी ने धर्मेंद्र के निधन पर शोक व्यक्त किया और एक भावुक श्रद्धांजलि साझा की। उन्होंने उन्हें अपना सब कुछ बताया: प्यार करने वाले पति, पिता, दोस्त और मार्गदर्शक, और साथ बिताए वर्षों को संजोया।