Join us
Daily Top 2Weekly Top 5

'इथे सेल्फी घ्यायला आलोय का आम्ही'; चाहत्यावर संतापल्या हेमा मालिनी, चार लोकांमध्ये केला पाणउतारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 16:50 IST

Hema malini : सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्यावर संतापल्या हेमा मालिनी

बॉलिवूडची ड्रीम गर्ल म्हणजेच अभिनेत्री हेमा मालिनी(Hema Malini) . उत्तम अभिनयासह आपल्या नृत्याविष्कारानेही या अभिनेत्रीने प्रेक्षकांना आपलंसं केलं. हेमा मालिनी यांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला आहे. आज त्या कोणत्याही सिनेमात दिसत नाहीत. मात्र, बॉलिवूडमधील पार्ट्या, पुरस्कार सोहळे यांसारख्या कार्यक्रमांना त्या आवर्जुन हजेरी लावतात. यामध्येच सध्या त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्यावर त्या संतापल्या.

Voompla या इन्स्टाग्राम पेजवर हेमा मालिनी यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये हेमा मालिनी या गुलजार यांच्या बायोग्राफी  'गुलजार साहब: हजार राहें मुड़कर देखें'च्या लॉन्च इव्हेंटमध्ये सहभागी झाल्याचं दिसून येत आहे. या इव्हेंटमध्ये त्या जात असताना एका चाहत्यांने त्यांच्याकडे सेल्फीची मागणी केली. मात्र, त्या चांगल्याच चिडल्या.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हेमा मालिनी यांना पाहिल्यावर चाहत्यांनी एकच गर्दी केली. अनेक जण त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी पुढे सरसावले. यामध्येच एक चाहत्याने त्यांच्याकडे सेल्फी काढण्याची मागणी केली. त्यावर, "आम्ही इथे सेल्फी घेण्यासाठी आलो आहोत का?" असं म्हणत हेमा मालिनी यांनी फोटो काढण्यास नकार दिला.

दरम्यान, त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. या इव्हेंटसाठी त्यांनी लाल आणि सोनेरी रंगाची साडी नेसली होती. तसंच त्यांनी केस मोकळे सोडले होते.आणि, या साडीला मॅचिंग असे सोन्याचे दागिनेही परिधान केले होते.

टॅग्स :हेमा मालिनीबॉलिवूडगुलजारसेलिब्रिटी