Join us
Daily Top 2Weekly Top 5

धर्मेंद्र यांचं 'ते' स्वप्न अपूर्णच राहिलं! पतीच्या आठवणीत हेमा मालिनी रडल्या, भावुक होत म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 09:19 IST

डोळ्यात अश्रू, तोंडून शब्द फुटेना! धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या-"आयुष्याच्या प्रत्येक वळणावर..."

Hema Malini Emotinal While Taking About Dharmendra:बॉलिवूडचे ही-मॅन ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं २४ नोव्हेंबर रोजी निधन झालं. वयोपरत्वे आलेल्या आजारांमुळे काही दिवस त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. निधनापूर्वी त्यांची प्रकृती चिंताजनक होती. यादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली. अभिनेत्याच्या निधनानंतर राहत्या घरी शोकसभेचे आयोजन केलं होतं. त्यानंतर आता पत्नी ११ डिसेंबर रोजी, अभिनेत्री आणि राजकारणी हेमा मालिनी यांनी त्यांचे दिवंगत पती आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यासाठी नवी दिल्लीत एका  शोकसभेचे  आयोजन केले.

धर्मेंद्र यांचं निधन त्यांच्या राहत्या घरी झालं. त्यानंतर लगेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काल हेमा मालिनी यांनी पती धर्मेंद्र यांच्या निधनानंतर दिल्लीतील त्यांच्या घरी शोकसभेचं आयोजन केलं. यादरम्यान, मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातील अनेक नामांकित व्यक्तींनी उपस्थिती दर्शवत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली.यावेळी हेमा मालिनी पतीच्या आठवणीत भावूक झाल्या. धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेत हेमा मालिनी यांनी त्यांच्या सुखी संसार आणि पती धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलल्या. यावेळी त्यांच्यासोबत ईशा आणि अहाना या दोन मुलीदेखील दिसल्या.तेव्हा त्या म्हणाल्या,"मला कधीच असं वाटलं नव्हतं  ती असा क्षण येईल की धरमजींसाठी शोकसभा आयोजित करावी लागले. याचा मी कधी विचारही केला नव्हता. संपूर्ण जग त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहे. पण, माझ्यासाठी हे खूप मोठं नुकसान आहे. धरमजी यांचं व्यक्तिमत्व फार मोठं आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असूनही त्यांनी कधीच स्वत ला इतरांपेक्षा वेगळं समजले नाही. त्यांचा हाच गुण प्रत्येकाला आपलंसं करायचा. गरीब असो किंवा इतक कोणी ते प्रत्येकासोबत प्रेम आणि आदराने वागायचे."

पुढे त्या म्हणाल्या, "मी धर्मेंद्रजींसोबत आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं, ज्यात मी त्यांच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. नंतर ते माझे जीवनसाथी बनले. आमचं प्रेम खरं होतं, म्हणूनच आम्ही दोघांनी लग्न केले.ते प्रत्येक क्षणी  माझ्यासोबत उभे राहिले, त्यांनी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ दिली आणि खंबीरपणे पाठीशी राहिले."

धर्मेंद्र यांचं ते स्वप्न अपूर्णच राहिलं...

दिल्लीत झालेल्या या शोकसभेत त्यांनी उपस्थितांना सांगितले की, आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये धर्मेंद्र यांनी उर्दूमध्ये कविता लिहायला सुरुवात केली होती आणि तेच त्यांची नवीन आवड बनली होती. धर्मेंद्र यांची ती आवड पाहून त्यांनी पतीला त्यांच्या कविता, शायरी पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित करण्याचा सल्ला दिला, परंतु त्यांचं ते स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचं निधन झाले. शोकसभेत हेमा म्हणाल्या, "धर्मेंद्र यांचं ते काम अपूर्णच राहिलं, जे त्याचं स्वप्न होतं." असं म्हणत हेमा मालिनी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Hema Malini Remembers Dharmendra, His Unfulfilled Dream, and Tears

Web Summary : Hema Malini held a prayer meeting in Delhi for Dharmendra. She spoke emotionally about their life together, his love for poetry, and his unfulfilled dream of publishing a book. She misses him dearly.
टॅग्स :धमेंद्रहेमा मालिनीबॉलिवूडसेलिब्रिटी