Join us

"डिसेंबरमध्ये परीक्षा आहे" शूटिंगच्या धावपळीतही अभिनेत्याचा अभ्यास, सेटवरील व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 16:48 IST

अभिनेत्यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Harshvardhan Rane: अभिनेता हर्षवर्धन राणे सध्या त्याच्या आगामी 'सिला' या चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. सध्या तो श्रीनगरमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. नुकताच त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या व्हिडीओमध्ये तो शूटिंगच्या धावपळीतही अभ्यास करताना दिसला.

हर्षवर्धन राणेने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो चित्रपटाच्या शूटिंगमधून मिळालेल्या मोकळ्या वेळेत अभ्यास करताना दिसत आहे. हा व्हिडीओ श्रीनगरमधील प्रसिद्ध दाल लेकच्या शिकारा बोटीमध्ये शूट करण्यात आला आहे. हर्षवर्धननं कॅप्शनमध्ये लिहलं, "डिसेंबरमध्ये परीक्षा आहे. पण ब्रेक दरम्यान किंवा गाडीत किंवा श्रीनगरधील डल तलावात बोटीत असताना, सिलाच्या शूटिंगदरम्यान मिळणाऱ्या प्रत्येक मिनिटाचा वापर करावा लागेल. दिवानियत २१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. जर तुम्ही यावेळेस तिकीट खरेदी केलं तर मी कदाचित चांगले गुण मिळवू शकेन".

हर्षवर्धन राणे सध्या मानसशास्त्रात ऑनर्स पदवी घेत आहे आणि या वर्षाच्या शेवटी त्याची परीक्षा आहे. हर्षवर्धन हा ओमंग कुमार दिग्दर्शित 'सिला' या चित्रपटात एका खास भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी त्याने मार्शल आर्ट्स आणि स्टंट्सचं कठोर प्रशिक्षण घेतलं आहे. चित्रपटात अभिनेत्री सादिया खतीब मुख्य भूमिकेत आहे, तर 'बिग बॉस १८'चा विजेता करण वीर मेहरा खलनायकाच्या भूमिकेत आहे. याशिवाय त्याचा 'एक दिवाने की दिवानियत' हा चित्रपट दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, म्हणजेच २१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :हर्षवर्धन राणेशिक्षण