Join us
Daily Top 2Weekly Top 5

हार्दिक पांड्याचा स्ट्रगलच्या दिवसातील फोटो पाहून भावूक झाली अभिनेत्री, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 11:04 IST

होय, हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आणि हा फोटो शेअर होत नाही तोच अभिनेत्रीची कमेंट आली.

ठळक मुद्देहार्दिक व उर्वशीची ओळख 2018 मध्ये एका पार्टीत झाली होती. यानंतर दोघांत मैत्री झाली आणि नंतर दोघांच्या भेटीगाठी सुरु झाल्यात.

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याचे नाव अनेक अभिनेत्रीशी जोडले गेले. यातलीच एक अभिनेत्री म्हणजे, उर्वशी रौतेला. हार्दिक व उर्वशी यांच्या अफेअरची चर्चा अनेकदा झाली. पण दोघांनीही यावर मौन बाळगणे पसंत केले. आता पुन्हा एकदा हार्दिकमुळे उर्वशी चर्चेत आहेत. होय, हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आणि हा फोटो शेअर होत नाही तोच उर्वशीची कमेंट आली. स्ट्रगलच्या दिवसातील या फोटोत हार्दिकने लोअर टी-शर्ट घाललेला असून तो एका लोडर ट्रकमध्ये बसलेला दिसतोय. हा फोटो शेअर करताना हार्दिक भावूक झाला.

‘जुन्या आठवणी. लोकल मॅच खेळण्यासाठी मी ट्रकमध्ये बसून जायचो. त्या दिवसांनी मला खूप काही शिकवले. हा प्रवास शानदार राहिला. हो, माझे माझ्या खेळावर प्रेम आहे...,’ असे हार्दिकने हा फोटो शेअर करताना लिहिले.

हार्दिकच्या या फोटोवर उर्वशीने लगेच भावूक प्रतिक्रिया दिली. ‘रिस्पेक्ट... मी सुद्धा बॉस्केटबॉल खेळण्यासाठी ट्रेनने प्रवास करायची....,’ असे तिने लिहिले.

हार्दिक व उर्वशीची ओळख 2018 मध्ये एका पार्टीत झाली होती. यानंतर दोघांत मैत्री झाली आणि नंतर दोघांच्या भेटी-गाठी सुरु झाल्यात. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा यादरम्यान पसरली. याच चर्चेदरम्यान उर्वशीने सोशल मीडियावर पोस्ट लिहून अशा अफवा पसरवणे बंद करा, मलाही घरच्यांना उत्तर द्यावे लागते, अशी विनंती केली होती.तूर्तास हार्दिक व अभिनेत्री नताशा स्टॅनकोव्हिक या दोघांच्या अफेअरच्या चर्चा जोरात आहेत. हार्दिकने अलीकडे नताशाची आपल्या कुटुंबीयांसोबत भेट घालून दिल्याचेही कळतेय. हार्दिकने अलीकडे  मी प्रेमात पडलोय, अशी पोस्ट लिहिली होती. त्यावर नताशाने ‘तुझ्याच प्रेमात’ असे उत्तर दिले होते. 

टॅग्स :हार्दिक पांड्याउर्वशी रौतेला