Guru Randhawa: प्रसिद्ध गायक गुरु रंधावाच्या प्रकृतीबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुरु रंधावानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. गुरु रंधावाला रुग्णालयातील बेडवर पडेललं पाहून त्याच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. पण, त्याला नेमकं काय झालं? त्याला रुग्णालयात का दाखल करण्यात आलं? असे अनेक प्रश्न पडले आहेत.
गुरु रंधावानं इन्स्टग्रामवर फोटो शेअर करत रुग्णालयात दाखल होण्यामागील कारण सांगितलं आहे. 'शौंकी सरदार' चित्रपटाच्या एका अॅक्शन सीनच्या शूटिंग दरम्यान त्याला दुखापत झाली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. त्यानं रुग्णालयातील फोटो शेअर करत लिहलं, "माझा पहिला स्टंट आणि पहिली दुखापत, पण माझं धाडस अबाधित आहे. शौंकी सरदार चित्रपटाच्या सेटवरील एक आठवण. खूप कठीण काम आहे, पण, माझ्या प्रेक्षकांसाठी मी कठोर परिश्रम करेन".
गुरु रंधावाची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूरहिनेदेखील कमेंट करत "काय झालं" असं विचारलं. तर ओरीनं, "अरे भावा लवकर बरा हो" अशी कमेंट केली. यासोबतच गायक मिका सिंगनेही, "लवकर बरा हो" अशा शुभेच्छा दिल्या. गुरु रंधावा सध्या त्याच्या'शौंकी सरदार' या पंजाबी चित्रपटाचे चित्रीकरण करतोय. ज्यामध्ये बब्बू मान, निमृत कौर अहलुवालिया आणि गुग्गु गिल यांच्याही भूमिका आहेत.