Join us

"मी मेली तरी चालेल, पण गोविंदाला..." सुनीता असं काय म्हणाल्या? चाहत्यांचे डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 10:04 IST

गोविंदाची पत्नी सुनीता यांनी एका मुलाखतीत एक किस्सा सांगितला आहे. तो वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. काय म्हणाल्या सुनीता

९० च्या दशकातील सुपरस्टार गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा यांच्यात घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा अनेकदा होत असतात, पण या चर्चा केवळ अफवा असल्याचे त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. सुनीता आहूजा यांनी नुकत्याच एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक अत्यंत भावूक प्रसंग शेअर केला. गरोदरपणाच्या वेळेस सुनीता यांचा जीव धोक्यात होता, त्यावेळी गोविंदाची अवस्था कशी होती, याचा खुलासा त्यांनी केलाय.

'माझी नाही, बाळाची काळजी घ्या'

सुनीता आहूजा यांनी 'ईट ट्रॅव्हल रिपीट' या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मुलगा यशवर्धनच्या जन्माचा किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या की, जेव्हा त्या गर्भवती होत्या, तेव्हा त्यांचे वजन तब्बल १०० किलोपर्यंत वाढले होते आणि त्यांना भीती वाटली होती की, त्या कदाचित बाळंतपणात वाचणार नाहीत. त्यावेळी, भारतात लिंग ओळख चाचणी कायदेशीर होती. त्यामुळे त्यांना मुलगा होणार आहे, हे माहीत होते.

बाळंतपणाच्या वेळी, सुनीताने डॉक्टरांना अत्यंत भावनिक आवाहन केले. "माझ्या पतीला मुलगा हवा आहे. त्यामुळे माझी नाही, पण माझ्या मुलाची काळजी घ्या, माझा जीव गेला तरी चालेल, पण मुलाला वाचवा" असं त्या म्हणाल्या होत्या.

गोविंदाची भावनिक अवस्था

सुनीता यांनी हे वाक्य बोलल्यानंतर समोर उभा असलेला गोविंदा रडू लागला आणि मोठ्याने ओरडू लागला. एखाद्या सिनेमात शोभावा तसा हा क्षण होता, अशा शब्दात सुनीता यांनी या प्रसंगाचं वर्णन केलं. नंतर सुनीता यांच्या डॉक्टरांनी आई आणि बाळ दोघांनाही वाचवलं. सुनीता-गोविंदा या दाम्पत्याला एक मुलगी टीना आणि एक मुलगा यशवर्धन आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुनीता यांनी गोविंदाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून घटस्फोटासाठी अर्ज केला आहे, अशी चर्चा होती. परंतु या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचं पुढे स्पष्ट झालं.

टॅग्स :गोविंदाबॉलिवूडप्रेग्नंसीगर्भवती महिला