बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) आणि त्याची पत्नी सुनिता आहुजा (Sunita Ahuja) गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत आहेत. गतवर्षी २०२५ मध्ये गोविंदा आणि सुनीता घटस्फोट घेणार असल्याचे समोर आले होते. यात सुनिताने गोविंदावर अनेक आरोपही केले होते. त्यानंतर आता सुनिता यांनी त्यांच्या आईविषयी काही खुलासे केले आहेत. यात एकेकाळी त्यांच्या आईने त्यांना गरम तव्याचे चटके दिले होते असं म्हटलं आहे.
सुनिता यांनी 'गलट्टा इंडिया'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी गोविंदासोबतच्या अफेअरविषयी भाष्य केलं. शाळेत असल्यापासून सुनिता आणि गोविंदा एकमेकांना डेट करत होते. मात्र, ही गोष्ट सुनिता यांच्या घरी जराही मान्य नव्हती. इतकंच नाही तर सुनिता यांना अभ्यासाचीही गोडी नव्हती. त्यामुळए त्यांच्या आईने एकदा त्यांना चांगलीच अद्दल घडवली होती.
''आठवीमध्ये असतांना नापास झाले होते पण, ही गोष्ट मी माझ्या आईपासून लपवून ठेवली होती. त्यावेळी मी गोविंदासोबत रिलेशनशीपमध्ये होते. मी माझ्या आईला खोटंच सांगितलं की, मी पास झाले. आणि, आईला माझ्या नापास होण्याविषयी आधीच माहित झालं होतं. त्यामुळे तिने रागामध्ये मला गरम तव्याचे चटके दिले'', असं सुनिता म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, ''माझी आई अभ्यासाच्या बाबतीत फारच कडक शिस्तीची होती. ती मला जबरदस्ती अभ्यास करायला लावायची आणि मला या गोष्टीचा फार राग यायचा. मी जेव्हा जेव्हा अभ्यास करायला पुस्तक उघडायचे. मला झोपच यायची.''
दरम्यान, गोविंदा आणि सुनिता यांनी १९८७ मध्ये लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे सुनिता यांच्या वडिलांचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे ते लग्नालादेखील आले नव्हते. वयाच्या १८ व्या वर्षी सुनिता यांनी गोविंदासोबत लग्न केलं होतं. त्यांनतर वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी टिनाला जन्म दिला.
Web Summary : Sunita Ahuja disclosed her mother burned her with a hot pan for failing school. She was dating Govinda then, which her family disapproved of. Her mother was very strict about studies.
Web Summary : सुनीता आहूजा ने खुलासा किया कि स्कूल में फेल होने पर उनकी मां ने उन्हें गरम तवे से जला दिया था। उस समय वह गोविंदा को डेट कर रही थीं, जिसे उनका परिवार नापसंद करता था। उनकी मां पढ़ाई को लेकर बहुत सख्त थीं।