Join us

पत्नीकडून गोविंदाला घटस्फोटाची नोटीस! जवळच्या व्यक्तीच्या मोठा खुलासा, म्हणाला- "सुनिताने काही महिन्यांपूर्वी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 15:59 IST

Govinda Divorce : सुनिताने काही महिन्यांपूर्वीच गोविंदाला घटस्फोटाची नोटीस पाठवल्याचा खुलासा जवळच्या व्यक्तीने केला आहे.

बॉलिवूड अभिनेता गोविंदा पत्नीपासून वेगळे होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. गोविंदा आणि सुनिता अहुजा घटस्फोट घेणार असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या नात्यात दुरावा आला असून घटस्फोट घेत ते वेगळे होणार असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत अद्याप अभिनेत्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र गोविंदा आणि सुनिताच्या निकटवर्तीयांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 

सुनिताने काही महिन्यांपूर्वीच गोविंदाला घटस्फोटाची नोटीस पाठवल्याचा खुलासा जवळच्या व्यक्तीने ईटाइम्सशी बोलताना केला आहे. "सुनिताने काही महिन्यांपूर्वीच घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. मात्र त्यानंतर काही घडलेलं नाही", अशी माहिती त्या व्यक्तीने दिली आहे. तर गोविंदाच्या मॅनेजरनेही ईटाइम्सला प्रतिक्रिया दिली आहे. "कुटुंबातील काही व्यक्तींनी केलेल्या वक्तव्यामुळे गोविंदा आणि सुनिताच्या रिलेशनशिपमध्ये थोडे प्रॉब्लेम सुरू आहेत. पण, त्यापेक्षा जास्त काहीच नाही. गोविंदा सध्या त्याच्या नव्या सिनेमाच्या शूटिंगच्या कामात व्यस्त आहे", असं मॅनेजरने सांगितलं आहे. 

गोविंदाचं ३० वर्षीय अभिनेत्रीसोबत अफेअर? 

गोविंदाचं नाव ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे. गोविंदा आणि सुनिता अहुजाच्या घटस्फोटासाठी ही अभिनेत्री कारणीभूत असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा आहेत. 

गोविंदाचा ३७ वर्षांचा संसार मोडणार?

गोविंदा आणि सुनिता अहुजा यांनी १९८७ साली लग्न केलं होतं. त्यांना दोन मुलं आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून ते एकत्र राहत नसल्याचा खुलासा सुनिता अहुजाने मुलाखतीत केला होता. आता गोविंदा आणि सुनिता अहुजाच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे त्यांचा ३७ वर्षांचा संसार मोडणार असल्याचं बोललं जात आहे. 

टॅग्स :गोविंदासेलिब्रिटीघटस्फोट