Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अगोदर फिल्म फायनान्स स्कीम लागू करा' अभिनेते राजदीप नाईक यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 16:15 IST

गाेव्यात इफ्फी सारखा आंतराष्ट्रीय महाेत्सव हाेत असूनही गाेव्यातील मात्र चित्रपट तयार होत नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे.

- नारायण गवस

गोवा सरकार गोमंतकीय चित्रपटांना प्रोत्साहन देत नाही तसेच या चित्रपटांसाठी असलेली फिल्म फायनान्स स्कीम दिली जात नसल्याने आज अनेक गोमंतकीय निर्मात्यांनी चित्रपट करणे बंद केले आहे. अगोदर ही स्कीम द्या अशी मागणी गाेमंतकीय चित्रपट निर्माते आणि अभिनेते राजदीप नाईक यांनी केली. 

गाेव्यात इफ्फी सारखा आंतराष्ट्रीय महाेत्सव हाेत असूनही गाेव्यातील मात्र चित्रपट तयार होत नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकरांनी २००४ मध्ये गाेव्यात इफ्फी आणला. गाेमंतकीय कलाकारांना राष्ट्रीय आंतराष्ट्रीय चित्रपट निर्मिती कशी होते तसेच कलाकार कसे असतात याची माहिती गाेमंतकीय कलाकारांना व्हावी हा या मागचा हेतू हाेता. तसेच आमचे गाेमंतकीय चित्रपट इफ्फीत यावे, असे आम्हाला वाटत होते.आम्ही २०१२ मध्ये तत्कालीन गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष स्व. विष्णू सुर्या वाघ यांच्याकडे जाऊन इफ्फीमध्ये गोवन सेक्शन सुरु करण्याची मागणी केली त्यानुसार गोमंतकीय चित्रपटांची संख्या वाढली. सुरवातीला गोमंतकीय अनेक निर्मात्यांनी आपले कराेडाे रुपये खर्च करुन चित्रपट काढले पण सरकारकडून काहीच अनुदान मिळाले नाही. ही याेजना आहे पण ती चालीस नाही त्यामुळे आता गोमंतकीय निर्मांत्यांनी असे चित्रपट करणे साेडून दिली आहे, असे राजदीप नायक यांनी सांगितले.मुुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गाेवा चित्रपट महोत्सव करणार असे सांगत आहे ताे त्यांना करावाच लागेल पण त्या अगोदर गोमंतकीय कलाकार प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने आर्थिक सहाय करावे. आज करोडाे रुपये खर्च करुन माेठे कलाकार आणले जातात. सरकार दिखावा करण्यासाठी करोडो रुपये खर्च करते. पण स्थानिक गोमंतकीयांना चित्रपट करण्यासाठी याेग्य ते अनुदान देत नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याची दखल घेणे गरजेचे आहे. असेही यावेळी राजदीप नाईक यांनी सांगितले.

टॅग्स :गोवाइफ्फीसिनेमा