Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या क्लबमध्ये विकला जातोय ‘उर्वशी रौतेला शॉट’, अभिनेत्रीने दिली अशी प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 08:00 IST

आपल्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या वेगळाच कारणाने चर्चेत आहे.

ठळक मुद्देउर्वशीच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास, सध्या ती ‘पागलपंती’ या चित्रपटात बिझी आहे.

आपल्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या वेगळाच कारणाने चर्चेत आहे. होय, गोव्याच्या क्लबमध्ये उर्वशी रौतेला नावाचे ड्रिंक्स विकल्या जात आहे. गोव्यात एक ड्रिंक्स लॉन्च करण्यात आलीय. या ड्रिंक्सला ‘उर्वशी रौतेला शॉट’ असे नाव देण्यात आले आहे.

सध्या गोव्यात नव्या वर्षाच्या स्वागताची  तयारी सुरु आहे. अशात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गोव्याच्या क्लब मालकांनी एक नामी शक्कल लढवली आहे. होय, उर्वशीच्या नावावर ड्रिंक्स लॉन्च करून त्याद्वारे ग्राहक आणि पर्यटकांना रिझवण्याचे क्लब मालकांचे प्रयत्न आहेत.

उर्वशीला याबाबत माहिती मिळाली, तेव्हा यावर तिने आनंद व्यक्त केला. गोव्याच्या क्लबने लढवलेली शक्कल मला आवडली. याबद्दल माझ्या मनात कुठलीही नकारात्मक भावना नाही. उलट मी आनंदी आहे. क्लब मालकांनी माझ्या नावाचा वापर केला याचा मला आनंद आहे. आशा करते, माझ्या नावाचा त्यांना फायदा होईल, असे उर्वशी म्हणाली.उर्वशीच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास, सध्या ती ‘पागलपंती’ या चित्रपटात बिझी आहे. यात जॉन अब्राहम, अर्शद वारसी, अनिल कपूर अशा अनेक बड्या स्टार्ससोबत ती स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

उर्वशीचेच नाव का?बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आहेत. मग ड्रिंक्सला उर्वशीचेच नाव का? असा प्रश्न गोव्याच्या क्लब मालकांना केला असता त्यांनी सांगितले की, उर्वशी एक फनलव्हिंग अभिनेत्री आहे. ती यावर नकारात्मक प्रतिक्रिया देणार नाही, याचा आम्हाला विश्वास होता. त्यामुळे आम्ही ड्रिंक्सला तिचे नाव दिले.  

 

टॅग्स :उर्वशी रौतेला