Join us
Daily Top 2Weekly Top 5

जिनिलियाचं करिअर संपलं देशमुख कुटुंबामुळे? अभिनेत्रीने केला मोठा खुलासा; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 13:10 IST

Riteish Deshmukh-Genelia Deshmukh : जिनिलिया देशमुखने लग्नानंतर सिनेइंडस्ट्रीत खूप मोठा ब्रेक घेतला होता. मात्र त्यानंतर डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'वेड' चित्रपटातून तिने सिनेइंडस्ट्रीत कमबॅक केले.

अभिनेता रितेश आणि जिनिलिया देशमुख (Riteish Deshmukh-Genelia Deshmukh) हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. ते दोघे सोशल मीडियावर सक्रीय असून एकमेकांसोबत मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या या व्हिडीओंना चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते. जिनिलियाचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. तिने लग्नानंतर सिनेइंडस्ट्रीत खूप मोठा ब्रेक घेतला होता. मात्र त्यानंतर डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'वेड' चित्रपटातून तिने सिनेइंडस्ट्रीत कमबॅक केले. रितेश-जिनिलियाच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 

जिनिलिया लग्नानंतर सिनेइंडस्ट्रीतून दुरावल्याची चर्चा बऱ्याचदा ऐकायला मिळाल्या होत्या. मात्र त्यावेळी तिने याविषयी काही बोलणं टाळलं होतं. दरम्यान आता जिनिलियाने यावर उत्तर दिले आहे. नुकतेच जिनिलिया आणि रितेशने करिना कपूरच्या 'व्हॉट वुमन वॉन्ट'मध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये तिने बऱ्याच प्रश्नांची उत्तर दिली आहेत. यावेळी तिने इंडस्ट्रीतून ब्रेक का घेतला होता, याबाबतही सांगितले. 

रितेश आणि जिनिलियाने त्यांच्या नात्याविषयी खुलासा केला आहे. लग्नानंतर रितेशने जिनिलियाला सिनेइंडस्ट्री सोडायला भाग पाडल्याचे बोलले जात होते. मात्र आता यावर उत्तर देत जिनिलिया म्हणाली की, लग्न झाल्यानंतर मला लग्नाला प्राधान्य द्यायचे होते. लग्नाआधी मी हिंदी, तेलुगू, तमिळ सिनेइंडस्ट्रीत खूप काम करत होते. लग्नानंतर काम थांबवणं हा पूर्णपणे माझा निर्णय होता. लग्नानंतर जेव्हा मी चित्रपटांमधून ब्रेक घेतला तेव्हा लोकांनी मला अनेक प्रश्न विचारले. रितेशचे वडील राजकारणात असल्यामुळे देशमुख कुटुंबियांनी माझी सिने कारकीर्द संपवली, असे अनेकांनी गृहीत धरले. पण तसे काहीच नव्हते. तसेच लोक त्यावेळेस असेही विचारत होते की, तुझे चित्रपटात काम करणे रितेशने थांबवले का?  तेव्हा प्रत्येक वेळी मला सगळे एकच उत्तर द्यायचे की, नाही. मलाच दीर्घकाळ कलाविश्वातून ब्रेक घ्यायचा आहे.

यावर रितेश म्हणाला की, कामातून ब्रेक घेणे हा सर्वस्वी जिनिलियाचा निर्णय होता. तिला यापूर्वीच पुन्हा एकदा इंडस्ट्रीत पदार्पण करायचे होते पण कोरोनामुळे ते लांबले. मी तिला अनेकदा सांगायचो की तुझं कॅमेऱ्यासमोर असणे तू मिस करत आहेस. त्यामुळे तू काम करायला सुरुवात कर. जिनिलिया आणि रितेशचे हे वक्तव्य सध्या खूप चर्चेत आहे. जिनिलिया बऱ्याच वर्षांनंतर वेड या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटातील तिच्या कामाचे सर्व स्तरावरुन कौतुकही झाले. याआधी जिनिलियाने दक्षिणात्य, हिंदी चित्रपटात काम केले आहे.

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजावेड चित्रपट