Join us
Daily Top 2Weekly Top 5

देशमुखांची सून शोभतेस! सुगड पूजन ते नैवेद्याचं ताट; जेनिलियाने पारंपरिक पद्धतीने साजरी केली मकरसंक्रांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 13:16 IST

Genelia deshmukh: अमराठी कुटुंबात लहानाची मोठ्या झालेल्या जेनेलियाने मराठी कुटुंबात आल्यानंतर मराठी संस्कृतीला चांगलंच आत्मसाद केलं आहे.

महाराष्ट्राचं लाडकं कपल म्हणून लोकप्रिय असलेली जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख (genelia deshmukh). २०१२ मध्ये लग्नगाठ बांधलेल्या या जोडीने त्यांच्या साधेपणाने आणि स्वभावातील नम्रपणाने प्रेक्षकांना, चाहत्यांना आपलंसं केलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये त्यांची कायम चर्चा रंगत असते. विशेष म्हणजे एका अमराठी कुटुंबात लहानाची मोठ्या झालेल्या जेनेलियाने मराठी कुटुंबात आल्यानंतर मराठी संस्कृतीला चांगलंच आत्मसाद केलं आहे. त्यामुळे पाडवा, दिवाळी असे सगळे सण, उत्सव ती अत्यंत छान पद्धतीने साजरे करते. यात नुकतीच तिने मकरसंक्रांत साजरी केली.

जेनेलिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. त्यामुळे ती तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील प्रत्येक घटना, किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात बऱ्याचदा ती तिच्या व्हिडीओ वा फोटोच्या माध्यमातून त्यांच्या घरात साजरे केले जाणारे सण, उत्सव यांची झलक दाखवत असते. विशेष म्हणजे जेनेलिया आणि रितेश यांनी त्यांच्या दोन्ही मुलांवर चांगले संस्कार केले आहेत. त्यामुळे नेटकरी सुद्धा त्यांच्या मुलांचं कौतुक करताना दिसतात. यामध्येच आता जेनेलियाने मकरसंक्रांतनिमित्त देवाची पूजा करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

जेनेलियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती देवाची छान पूजाअर्चा करतांना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तिने देवासमोर छान फुलांची आरास केली आहे. सुगड पूजन केलं आहे. सोबतच एका डिशमध्ये देवाला नैवेद्यही ठेवला आहे. त्यामुळे जेनेलियाने मराठी पारंपरिक पद्धतीने मकरसंक्रांत साजरी केल्याचं दिसून येत आहे. जेनेलियाने हा व्हिडीओ पोस्ट करत तिने चाहत्यांना संक्रांत सणाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

टॅग्स :जेनेलिया डिसूजामकर संक्रांतीबॉलिवूडरितेश देशमुखसेलिब्रिटी