Join us

23वर्षांचा झाला शाहरुख खानला लेक, गौरीने बर्थडेच्या दिवशी शेअर केला आर्यनचा खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 19:37 IST

आर्यन अजून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले नाही.

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि गौरी खान यांचा मुलगा आर्यन खान आज आपला 23 वा वाढदिवस साजरा करीत आहे. आर्यन अजून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले नाही पण सोशल मीडियावर त्याची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. 

 त्याचा दिवस अधिक खास करण्यासाठी आर्यनची आई गौरी खानने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक खास पोस्ट सोशल मीडिया शेअर केली आहे. गौरीने सुहाना, आर्यन आणि अबरामचे एकत्र  फोटो शेअर केले आहे. 

आर्यनने यात ब्लॅक कलरचा स्वेटशर्ट घातला आहे जो त्याच्यावर उठून दिसत आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये गौरीने लिहिले - बर्थडे बॉय. अनेक यूरर्सनी आर्यनला ज्युनिअर शाहरुख म्हटले आहे. वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाल तर आर्यन शाहरुख खानसोबत 'द लॉयन किंग' सिनेमात काम केले होते. शाहरुखने या सिनेमात मुसाफाला आवाज दिला होता तर आर्यनने सिम्बाचे व्हॉयस ओवर डब केले होते.  आर्यनला करण जोहर लॉन्च करणार आहे. आर्यन साऊथच्या सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात करणार अशी चर्चा होती.  

टॅग्स :आर्यन खानगौरी खान