Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 10:09 IST

गौरी खानने कधीच धर्मांतर का केलं नाही? म्हणाली...

शाहरुख आणि गौरी ही बॉलिवूडमधील आदर्श जोडी आहे. त्यांच्या लग्नाला ३० वर्ष झाली असून आजही हे फॉरेव्हर यंग कपल म्हणून ओळखलं जातं. शाहरुख मुस्लिम असून गौरी हिंदू परिवारातील आहे. त्यांना आर्यन, सुहाना आणि अबराम ही तीन मुलं आहेत. गौरीने कधीच धर्मबदल केला नाही. 'कॉफी विद करण' मधील तिचं वक्तव्य आता पुन्हा व्हायरल होतंय. यात तिने मी कधीच मुस्लिम होणार नाही असं म्हटलं आहे. 

काही वर्षांपूर्वी 'कॉफी विद करण' मध्ये गौरी खान आणि हृतिक रोशनची एक्स वाईफ सुजैन खान सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी गौरी म्हणाली, "आर्यन नेहमी शाहरुखला फॉलो करतो. तो शाहरुखचाच धर्म स्वीकारेल असं मला वाटतं. तो नेहमी म्हणतो मी मुस्लिम आहे. जेव्हा हे तो माझ्या आईला सांगतो तेव्हा ती म्हणते तुला नक्की काय म्हणायचंय? म्हणजे ती नाराज होत नाही. ती आता एकंदर या गोष्टी समजून घेत आहे. पण हे खरं आहे. "

गौरी पुढे म्हणाली, "मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते पण याचा अर्थ हा नाही की मी सुद्धा धर्मांतर करेन. मी मुस्लिम होणार नाही. माझा धर्मांतरावर विश्वास नाही. प्रत्येकाचं आयुष्य आहे आणि प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन केलं पाहिजे असं मला वाटतं. यात कुठेही अनादर होऊ नये. म्हणजे शाहरुखनेही माझ्या धर्माचा अनादर करु नये."

शाहरुख आणि गौरी हे पॉवर कपल म्हणून ओळखलं जातं. आता त्यांच्या मुलांनीही इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. सुहानाने 'द आर्चीज' मधून पदार्पण केलं. आता ती लवकरच एका अॅक्शन चित्रपटात दिसणार आहे ज्यामध्ये स्वत: शाहरुख असणार आहे. तर आर्यन खानने अभिनय क्षेत्र न निवडता दिग्दर्शन क्षेत्रात काम सुरु केलं आहे. 

टॅग्स :गौरी खानमुस्लीमहिंदूशाहरुख खानआर्यन खान