Join us
Daily Top 2Weekly Top 5

26 वर्षांनंतर शाहरूखच्या ‘बाजीगर’बद्दल गौरी खानने केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 16:34 IST

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची पत्नी गौरी खान सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे. स्वत:चे आणि कुटुंबाचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. ताजा फोटोही असाच. होय, गौरीने शाहरूखचा 26 वर्षे जुना फोटो शेअर केला आहे.

ठळक मुद्दे‘बाजीगर’ हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला होता.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची पत्नी गौरी खान सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे. स्वत:चे आणि कुटुंबाचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. ताजा फोटोही असाच. होय, गौरीने शाहरूखचा 26 वर्षे जुना फोटो शेअर केला आहे.  हा फोटो शाहरूखच्या कुठल्या चित्रपटाचा आहे, हे तुम्ही ओळखलेच असेल. होय, ‘बाजीगर’ या चित्रपटाचा. १९९३ साली प्रदर्शित झालेल्या ‘बाजीगर’  चित्रपटात शाहरुखसोबत  काजोल आणि शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत होत्या. तब्बल २६ वर्षांनंतर या चित्रपटासंदर्भात गौरी खानने एक खुलासा केला आहे. हा खुलासा म्हणजे, या चित्रपटातील शाहरूखचा लूक गौरीने स्वत: डिझाईन केला होता.‘ये काली काली आंखे’ या गाण्यातील शाहरुखने पांढ-या रंगाचा टी-शर्ट आणि त्यावर लाल रंगाचा शर्ट परिधान केला होता. शाहरुखचा हा आउटफिट खुद्द गौरी खानने डिझाइन केला होता.

‘माझा विश्वास बसत नाही की मी ९०च्या दशकातील शाहरूखचह जीन्स, त्याचा टी-शर्ट, बुलेट बेल्ट आणि रेड शर्ट मी डिझाइन केला आहे. हाताने रंगवलेली ही जीन्स माझी आवडती होती,’ असे गौरीने फोटो शेअर करताना लिहिले आहे.

‘बाजीगर’ हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला होता.  या चित्रपटात शाहरूख निगेटीव्ह भूमिकेत होता. त्याच्या या नकारात्मक भूमिकेची विशेष प्रशंसा झाली होती.  अब्बास मस्तान दिग्दर्शित या चित्रपटातून अभिनेत्री शिल्पा शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.  

टॅग्स :गौरी खानशाहरुख खान