Join us
Daily Top 2Weekly Top 5

गौरी खानने सजवले सिद्धार्थ मल्होत्राचे घर, पाहा व्हिडिओ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 12:51 IST

सिद्धार्थ मल्होत्राचा तीन बेडरूमचा फ्लॅट कुणी डिझाईन केला माहितेय? गौरी खान हिने.

सिद्धार्थ मल्होत्राने या वर्षाच्या सुरुवातीला आपले ड्रिम होम खरेदी केले होते आणि आता तो आपल्या या घरात शिफ्ट झाला आहे. होय, आई-वडिल दिल्लीतून आले की त्यांना मुंबईत आपल्यासोबत राहता यावे, अशी सिद्धार्थची इच्छा होती आणि यासाठी दीर्घकाळापासून त्याने मनासारख्या घराचा शोध चालवला होता. अखेर पाली हिल्स सारख्या पॉश भागात एका अपार्टमेंटच्या नऊच्या माळ्यावरचा फ्लॅट त्याला मिळाला. तीन बेडरूमचा हा फ्लॅट कुणी डिझाईन केला माहितेय? गौरी खान हिने. होय, शाहरुख खानची पत्नी आणि एक यशस्वी इंटेरियर डिझाईनर गौरी खान हिने सिद्धार्थच्या या फ्लॅटचे इंटेरिअर केले आहे.

यापूर्वी गौरीने करण जोहरच्या मुलांची रूम सजवली होती. याशिवाय रणबीर कपूर, वरूण धवन आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्याही घरांचे इंटेरियर केले होते. आता गौरीने सिद्धार्थच्या फ्लॅटचे इंटेरियर केले. हे इंटेरियर इतके अप्रतिम आहे की, पाहताक्षणी तुम्ही या घराच्या प्रेमात पडाल. होय, गौरीने सिद्धार्थच्या फ्लॅटचा व्हिडिओ शेअर आहे. या व्हिडिओत गौरीच्या कामाची एक झलक दिसते. हे घर सजवताना गौरीने भौमितिक डिझाईनचा वापर केला आहे. लिव्हिंगरूममध्ये सिद्धार्थच्या आवडत्या चित्रपटांची काही पोस्टर्स आहेत. डायनिंग एरियाही खास आहे.सिद्धार्थच्या नव्या घराचा हा इनसाईड व्हिडिओ तुम्हीही पाहा आणि कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. सिद्धार्थ मल्होत्रा सध्या ‘जबरियां जोडी’ या चित्रपटात बिझी आहे. यात तो परिणीती चोप्रासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट हातावेगळा करताच तो ‘मरजावां’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो तारा सुतारियासोबत आॅनस्क्रिन रोमान्स करताना दिसणार आहे.

टॅग्स :सिद्धार्थ मल्होत्रागौरी खान