Join us

गौहर खान पतीहून १२ वर्षांनी मोठी, वयातील अंतरामुळे झालेली ट्रोल; आता म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 11:32 IST

गौहर खानने २०२० साली जैद दरबारसोबत लग्न केलं. २०२३ साली तिला मुलगा झाला. आता ती दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे.

'बिग बॉस ७'ची विजेती गौहर खान (Gauhar Khan) दुसऱ्यांदा आई होणार आहे. २०२३ साली तिला मुलगा झाला ज्याचं नाव जेहान आहे. तर आता दोन वर्षांनी ती पुन्हा गरोदर आहे. दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे गौहर खान सध्या चर्चेत आहे. नुकतीच ती 'फौजी २' सीरिजमध्ये दिसली. तसंच ती युट्यूबवर 'माँनोरंजन' हे पॉडकास्टही घेते. यामध्ये ती अभिनेत्रींना बोलवून त्यांच्या प्रेग्नंसी काळातले किस्से ऐकवते. 

गौहर खानने २०२० साली जैद दरबारसोबत लग्न केलं. इन्स्टाग्रामवर त्यांची ओळख झाली होती. गौहर जैदहून तब्बल १२ वर्षांनी मोठी आहे. जैद सध्या केवळ २९ वर्षांचा असून गौहर ४१ वर्षांची आहे. वयातील अंतरामुळे गौहरला कायम ट्रोल केलं गेलं होतं. नुकतंच ती या ट्रोलिंगवर म्हणाली, "मीडियामध्ये वाटेल ते बोललं जातं. आम्ही कधीच त्यावर भाष्य केलं नव्हतं. १२ वर्ष छोट्या जैदसोबत मी लग्न केलं अशी हेडलाईन बनली. १२ वर्ष? हा मुद्दा आलाच कुठून? स्वत: आमच्या वयाबाबतीत लिहिण्याआधी आम्हाला विचारायचं तरी."

ती पुढे म्हणाली, "किती जरी वयात अंतर असलं तरी आम्हाला दोघांना फरक पडत नाही. पण आम्हाला न विचारता इतकं सगळं मीडियात आलं तेव्हा मला वाईट वाटलं होतं. आम्हाला वयामुळे काही अडचण आली नाही. इंडस्ट्रीतही असे अनेक कपल आहेत ज्यांच्यामध्ये वयाचं अंतर आहे. वयातील अंतरामुळे काहीही फरक पडत नसतो. पण प्रॉब्लेम हा आहे की काहीही लिहिण्याआधी कमीत कमी आम्हाला विचारलं गेलं पाहिजे. आम्ही तुम्हाला खरं ते सांगू. मला कोणालाही स्पष्टीकरण द्यायचं नाही. त्या हेडलाईनंतर आम्ही कधीच कुठेही स्टेटमेंट दिलं नाही. तुम्ही २ वर्षांचं अंतर लिहा नाहीतर १२ वर्षांचं...फरक पडत नाही. मला आणि जैदलाच काही वाटत नाही तर जग काहीही बोलेल काय फरक पडतो."

"आम्ही आमच्या नात्याच्या सुरुवातीलाच ठरवलं होतं की आम्ही कधी लग्न करणार हे सगळ्यांसोबत शेअर करु. सगळ्यांचे आशीर्वाद घेऊ. आम्ही आमच्या कुटुंबियांचा सल्ला घेतला नव्हता. आम्ही एकमेकांच्या कुटुंबियांना भेटलो. त्यांना आम्ही फक्त एवढं सांगितलं की या तारखेला आम्ही लग्न करत आहोत. जर तुम्हाला आशीर्वाद द्यायचा असेल तर लग्नाला नक्की या." असंही ती म्हणाली. 

टॅग्स :गौहर खानटिव्ही कलाकारट्रोल