Join us
Daily Top 2Weekly Top 5

गौहर खानने दाखवला धाकट्या लेकाचा चेहरा; उमराह यात्रेदरम्यान शेअर केला खास फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 17:45 IST

गौहर खानने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री गौहर खान आणि सोशल मीडिया स्टार जैद दरबार यांच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. गेल्या वर्षी दुसऱ्यांदा आई-बाबा झालेल्या या जोडीने आतापर्यंत आपल्या धाकट्या लेकाचा चेहरा जगापासून लपवून ठेवला होता. मात्र, चाहत्यांची ही प्रतीक्षा आता संपली असून गौहरने तिचा दुसरा मुलगा 'फरवान'ची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

विशेष म्हणजे, या जोडीने आपल्या धाकट्या मुलाची 'मुँह दिखाई' अत्यंत आध्यात्मिक पद्धतीने केली आहे. उमराहच्या पवित्र यात्रेदरम्यान काबा शरीफ समोर उभे राहून त्यांनी फरवानचा चेहरा चाहत्यांना दाखवला. "मोठ्या मुलाचा (जेहान) पहिला सलाम काबा येथून झाला होता, त्यामुळे धाकट्या मुलाची सुरुवातही तिथूनच होणे योग्य होते," असे कॅप्शन देत गौहरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

गौहरने शेअर केलेल्या य फोटोंमध्ये ती, जैद आणि त्यांचे दोन्ही चिमुकले एकत्र दिसत आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांनी अवघ्या काही तासांत लाईक्सचा वर्षाव केला आहे. मनोरंजनसृष्टीतील भारती सिंह, दिव्या अग्रवाल आणि सोफी चौधरी यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करत या गोड कुटुंबावर प्रेमाचा वर्षाव केला असून चिमुकल्या फरवानला आशीर्वाद दिले आहेत.

गौहर खान आणि जैद दरबार यांनी २०२० मध्ये विवाहगाठ बांधली होती. 'बिग बॉस ७' ची विजेती आणि उत्तम अभिनेत्री म्हणून गौहरची ओळख आहे, तर जैदने आपल्या डान्स आणि मजेशीर व्हिडिओंनी सोशल मीडियावर स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आता दोन मुलांचे पालक म्हणून ही जोडी आपल्या आयुष्यातील हा नवा टप्पा अत्यंत आनंदाने आणि जबाबदारीने एन्जॉय करत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gauahar Khan reveals youngest son's face during Umrah pilgrimage.

Web Summary : Gauahar Khan and Zaid Darbar revealed their second son, Farhaan's face during their Umrah pilgrimage. They previously kept him hidden. The couple mentioned their elder son, Zehaan, first visited Kaaba, so Farhaan's introduction was fitting. Celebrities blessed the family.
टॅग्स :गौहर खानटिव्ही कलाकारसोशल मीडिया