Join us
Daily Top 2Weekly Top 5

या अभिनेत्यानेही घेतला जगाचा निरोप, दिल्लीत निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 10:18 IST

रविवारी 24 मे रोजी अभिनेत्याची प्रकृती अचानक बिघडली. 

ठळक मुद्देकाही महिन्यांपूर्वीच ‘पुष्पा छोरी पौडी खाल की’ची अभिनेत्री रीना रावत हिचे निधन झाले होते.   

बॉलिवूडने काही दिवसांपूर्वीच दोन दिग्गज गमावलेत. इरफान खान व ऋषी कपूर यांच्या निधनाचे दु:खातून चाहते सावरत नाही तोच आता अनेक सुपरहिट गढवाली गाण्यांमध्ये झळकलेला अभिनेता व गायक जयपाल नेगी यानेही जगाचा निरोप घेतला. दिल्लीत जयपाल नेगीने अंतिम श्वास घेतला.मूळचा पौडी गढवालस्थित संगलाकोटीचा राहणारा जयपाल आपल्या कुटुंबासह दिल्लीत राहत होता. जयपालने उत्तराखंडच्या अनेक गढवाली गाण्यांत अभिनय करून चाहत्यांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती. 

जयपाल अनेक दिवसांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होता. रविवारी 24 मे रोजी त्याची प्रकृती अचानक बिघडली. कुटुंबीयांनी त्याला दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रूग्णालयात दाखल करण्याची तयारी केली. मात्र वाटेतच जयपालचे निधन झाले.त्याच्या निधनाने उत्तराखंड फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या निधनाचे वृत्त कळताच अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्याला श्रद्धांजली वाहिली.

आपल्या पहाडी आवाजात ‘पुष्पा छोरी पौडी खाल की’, ‘न्योला न्योला’, ‘चंद्रा छोरी’ अशी अनेक गाणी गाण्यासोबतच त्याने या गाण्यांमध्ये अभिनय केला होता. त्याची पत्नी कोमल राणा नेगी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. काही महिन्यांपूर्वीच ‘पुष्पा छोरी पौडी खाल की’ची अभिनेत्री रीना रावत हिचे निधन झाले होते.

  

टॅग्स :बॉलिवूड