गणेशोत्सव संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबईतील लालबाग-परळमध्ये गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळते. नवसाला पावणाऱ्या अशी ख्याती असलेल्या लालबागचा राजावर भाविकांची श्रद्धा आहे. दरवर्षी लाखो भाविक लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. तर सेलिब्रिटीही लालबागचा राजाच्या चरणी नतमस्तक होतात. यंदाही सेलिब्रिटी लालबागचा राजाच्या दर्शनासाठी हजेरी लावत आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी गेले होते. जान्हवीने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तर काही व्हिडीओही समोर आले आहेत. यामध्ये गर्दीतून वाट काढत सिद्धार्थ आणि जान्हवी राजाच्या दरबारात दिसत आहेत. लालबागचा राजाचं दर्शन घेत ते दोघेही बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा त्यांच्या आगामी 'परम सुंदरी' या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. २९ ऑगस्टला 'परम सुंदरी' सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या ते दोघेही बिझी आहेत.