Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयुष शर्माने दिला बाप्पाला अखरेचा निरोप; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 17:41 IST

Aayush Sharma: शनिवारी दीड दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. यात अभिनेता आयुष शर्मानेही त्याच्या बाप्पाला निरोप दिला.

ठळक मुद्देसलमानशिवाय झालं गणरायाचं विसर्जन

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचं प्रसन्न वातावरण आहे. अनेकांच्या घरी गणरायाची स्थापना झाली आहे. अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. यात शनिवारी( ११ सप्टेंबर) दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. यात अभिनेता आयुष शर्मानेही त्याच्या बाप्पाला निरोप दिला. सध्या सोशल मीडियावर आयुष आणि त्याच्या बाप्पाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात आयुष खिन्न मनाने बाप्पाला निरोप देत आहे.

प्रसिद्ध छायाचित्रकार योगेश शहा यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर आयुष आणि त्याच्या बाप्पाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता सोहेल खान आणि आयुष गणपतीचं विसर्जन करताना दिसत आहेत. 

दरम्यान, आयुषप्रमाणेच अभिनेता सलमान खानच्या घरीदेखील गणरायाचं आगमन झालं आहे. मात्र, यंदा पहिल्यांदाच सलमान गणरायाच्या स्वागतासाठी उपस्थित नव्हता. सलमान सध्या त्याच्या आगामी 'टायगर ३' या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचं  ऑस्ट्रेलियातमध्ये चित्रीकरण सुरु आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात त्याला सहभागी होता आलं नाही.

टॅग्स :अर्पिता खानगणेशोत्सव विधीसलमान खानसोहेल खान