Salman Khan Ganpati Bappa: गणेश चतुर्थीच्या उत्साहानंतर आता गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. काल (२८ ऑगस्ट) संध्याकाळी बॉलिवूडमध्येही गणेश विसर्जनाची धूम पाहायला मिळाली. अनेक कलाकारांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. यात अभिनेता सलमान खानने कुटुंबासोबत बाप्पाचं विसर्जन ( Ganesha Visarjan Salman Khan House In Mumbai) केलं.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सलमानच्या घरी गणपतीची स्थापना झाली होती. दीड दिवस बाप्पाची पूजा झाल्यानंतर काल सायंकाळी विसर्जन करण्यात आले. यावेळी सलमानने कुटुंबातील सदस्यांसह गणेश विसर्जन मिरवणुकीत जोरदार डान्स केला. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमानसोबत त्याची बहीण अर्पिता, तिचे मुलं आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिचा पती झहीर इक्बाल हेदेखील नाचताना दिसत आहेत.
यावेळी सलमानने अतिशय साधा पण स्टायलिश लूक केला होता. त्याने राखाडी रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स घातली होती. सलमानच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. आता तो लवकरच 'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या चित्रपटात तो कर्नल संतोष बाबू यांची भूमिका साकारणार असून, पहिल्यांदाच एका खऱ्या आयुष्यातील नायकाची भूमिका साकारणार आहे.