Join us
Daily Top 2Weekly Top 5

'गांधी गोडसे-एक युद्ध' का फ्लॉप झाला? राजकुमार संतोषी म्हणाले, " शाहरुख खानने खूपच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 15:32 IST

राजकुमार संतोषी यांना सिनेमा चालणार असा पूर्ण विश्वास होता.

दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांचा 'गांधी-गोडसे एक युद्ध' (Gandhi Godse Ek Yuddh) हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. मात्र हा सिनेमा फारशी कमाल करु शकला नाही. याचं कारण म्हणजे त्याचदिवशी शाहरुख खानचा 'पठाण' रिलीज झाला होता. पठाणने बॉक्सऑफिसवर काय धुमाकूळ घातला हे तर सर्वांनीच पाहिलं. पठाण सोबत क्लॅश झाल्याने गांधी गोडसे सिनेमाकडे जास्त प्रेक्षक ओढले गेले नाहीत. संतोषी यांना सिनेमा चालणार असा पूर्ण विश्वास होता.

गांधी गोडसे एक युद्ध सिनेमात पहिल्यांदाच महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्यातील वैचारिक युद्ध दाखवलं आहे. अनेकांनी सिनेमाला प्रतिसाद दिला मात्र फार काळ तो थिएटरमध्ये राहिला नाही. यावर संतोषी म्हणाले,"मला सिनेमाकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र रिलीजची वेळ चुकली. मला प्रमोशनवरही फोकस करायला हवा होता. याची खंत कायम राहील."

ते पुढे म्हणाले,"त्याचवेळी शाहरुख खानचा पठाण रिलीज झाला होता. त्या फिल्मची इतकी हवा झाली की आमचा सिनेमा हरवला. पठाण ची पब्लिसिटी मोठ्या प्रमाणात झाली होती. तेव्हा फक्त पठाणचा विषयच सुरु होता. लोक केवळ पठाणचे कलेक्शन, वाद, गाणी याची चर्चा करत होते. अपेक्षेपेक्षा जास्तच हाईप झाला होता. यापूर्वीचे शाहरुखचे २ ते ३ सिनेमे आपटले होते. त्याने खूप जोर लावला होता. पण ठिके इंडस्ट्रीत हे होत राहतं."

'गांधी-गोडसे एक युद्ध' हा सिनेमा २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता. पठाणच्या तुलनेत या सिनेमाला मिळणार प्रतिसाद खूपच थंड होता.फिल्म कधी थिएटरमधून बाहेर पडली याचा कोणाला अंदाजही नाही आला. 

टॅग्स :सिनेमापठाण सिनेमाचिन्मय मांडलेकरशाहरुख खान