Join us  

Karan Deolच्या रोका सेरेमनीमध्ये 'देओल ब्रदर्स'ची धमाल मजा-मस्ती, सनी-बॉबी-अभयने कॅमऱ्यासमोर दिल्या पोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 11:24 AM

सनी देओलचा मुलगा करण देओलच्या रोका सेरेमनीत चर्चा झाली ती अभय देओल, सनी देओल आणि बॉबी देओल यांच्या बॉन्डिंगची.

सनी देओलचा मुलगा करण देओल आणि द्रिशा आचार्य अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांना डेट केल्यानंतर आता कुटुंबांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काल म्हणजेच १२ जून रोजी करण देओल आणि द्रिशा आचार्य यांचा रोका सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात बॉलिवूडचे अनेक स्टार्स पोहोचले होते, मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं ते अभय देओलने.अभय देओल, सनी देओल आणि बॉबी देओल यांचं एकत्र फोटो व्हायरल झाले होते. 

इतके पाहुणे असूनही सर्वांच्या नजरा देओल ब्रदर्सवर खिळल्या होत्या. यादरम्यान बॉबी देओल, सनी देओल आणि अभय देओल एकत्र कॅमेऱ्यात कैद झाले. तिन्ही भाऊ पापाराझींसमोर उभे राहिले आणि पोझ दिल्या . यावेळी तिघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत होता. दुसरीकडे, देओल बंधूंचा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी यावर  प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभय देओल बऱ्याच दिवसांनी सनी देओल आणि बॉबी देओलसोबत दिसला.

तिन्ही भावांना बघून लोकांना भलताच आनंद झाला आहे. व्हिडिओवर लोकांच्या अनेक मजेदार कमेंट्स पाहायला मिळाल्या. एका यूजरने लिहिले, "बॉक्स ऑफिसवर क्लॅश" तर दुसरा म्हणाला, "बाबा निराला वेस्टर्न कपड्यांमध्ये".  यूजर या आनंदाच्या प्रसंगी तिन्ही भावांना एकत्र पाहून खूप आनंद झाला.

टॅग्स :सनी देओलअभय देओलकरण देओलबॉबी देओल