Join us
Daily Top 2Weekly Top 5

सूडाची भावना, लाल रंग आणि मुसळधार पाऊस! 'धुरंधर २'चं पहिलं पोस्टर रिलीज, टीझर कधी येतोय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 10:57 IST

मंगळवारी, ३ फेब्रुवारी २०२६ रोजी निर्मात्यांनी या चित्रपटाचे नवीन आणि अत्यंत प्रभावी पोस्टर प्रदर्शित केले आहे, ज्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

बॉलिवूडचा पॉवरहाऊस अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट 'धुरंधर २' मुळे (Dhurandhar 2) चर्चेत आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या यशानंतर आता प्रेक्षक दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मंगळवारी, ३ फेब्रुवारी २०२६ रोजी निर्मात्यांनी या चित्रपटाचे नवीन आणि अत्यंत प्रभावी पोस्टर प्रदर्शित केले आहे, ज्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

प्रदर्शित झालेल्या नवीन पोस्टरमध्ये रणवीर सिंगचा लूक अत्यंत हिंसक लूक दिसत आहे. पावसाने भिजलेला रणवीर, अंगात काळे लेदर जॅकेट आणि चेहऱ्यावर सूडाची भावना स्पष्टपणे दिसून येत आहे. पोस्टरची पार्श्वभूमी लाल रंगाची असून ती चित्रपटातील थरार आणि ॲक्शनकडे सर्वांचं लक्ष वेधत आहे. रणवीरने स्वतः हे पोस्टर शेअर करत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

या चित्रपटाचे पूर्ण नाव 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar: The Revenge) असे असून, पोस्टरसोबतच निर्मात्यांनी आज दुपारी १२:१२ वाजता चित्रपटाचा अधिकृत टीझर प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. पोस्टरवरील "१२.१२" या वेळेने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली असून हा 'मोठा धमाका' काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 रणवीर सिंगचा हा रांगडा अवतार पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. "रणवीर परत आला आहे!", "आतापर्यंतचा सर्वात हिंसक लूक" आणि "हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आग लावेल" अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली रणवीरचा हा 'ॲक्शन मॅन' अवतार पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

या चित्रपटात रणवीर सिंगसोबत इतर कोणते कलाकार दिसणार आणि कथा नेमकी कोणत्या वळणावर असेल, याचा उलगडा लवकरच होणाऱ्या टीझरमधून होईल. सध्या तरी 'धुरंधर २' च्या या पहिल्या झलकने बॉलिवूडमध्ये मोठी हवा निर्माण केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ranveer Singh's 'Dhurandhar 2' poster: Revenge, rage, and rain!

Web Summary : Ranveer Singh's 'Dhurandhar 2' poster unveils a violent look amidst revenge and rain. The teaser releases today, promising action. Fans eagerly await this new avatar.
टॅग्स :धुरंधर सिनेमारणवीर सिंगबॉलिवूडसारा अर्जुनअक्षय खन्ना