Join us

पूनम पांडेच्या मुंबईतील घराला लागली आग, मोलकरीण बनली 'देवदूत', वाचवले कुत्र्याचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 12:01 IST

घरात आग लागली तेव्हा आत असलेले निम्म्याहून अधिक सामान जळून राख झाले

Poonam Pandey Mumbai House Fire : इंटरनेट सेन्सेशन आणि अभिनेत्री मॉडेल पूनम पांडे ही साऱ्यांनाच माहिती आहे. ती गेल्या काही वर्षांपासून अनेक चांगल्या-वाईट गोष्टींमुळे वादात सापडली आहे. ती शेवटची 'लॉक अप' या OTT प्लॅटफॉर्मच्या रिअँलिटी शो मध्ये दिसली होती. पण सध्या ती एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. मुंबईतील तिच्या घराला आग लागल्याने ती चर्चेत आहे. घरात आग लागली तेव्हा आत असलेले निम्म्याहून अधिक सामान जळून राख झाले. त्याची छायाचित्रे समोर आली, तेव्हा ती खरोखरच भीतीदायक होती. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे तिचा पाळीव कुत्रा घरात आग लागण्याच्या वेळी घरात होता, त्याला वाचवण्यात यश आले आहे. आगीचे कारण शोधण्यासाठी अग्निशमन विभागाकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

नक्की काय घडला प्रकार?

पूनम पांडे तिच्या अपार्टमेंटमध्ये नसताना आग लागली. सोसायटीतील राजन नावाच्या मुलाने अग्निशमन दलाला फोन केला. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. त्याच वेळी अभिनेत्रीच्या घरी तिचा पाळीव कुत्रा सीझर होता. मोलकरणीने त्या कुत्र्याला वाचवले आणि पूनमच्या बहिणीच्या स्वाधीन केले.

पूनम पांडेच्या घरातील भयानक चित्र

'व्हायरल भयानी'च्या अकाऊंटवरून पूनम पांडेच्या घराचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये बेडरूमचा फोटो आहे. ज्यामध्ये एसी पूर्णपणे जळून राख झाला आहे. त्या भिंतीची अवस्थाही पूर्णपणे बिकट झाली आहे. एसीमध्ये काही शॉर्ट सर्किट झाल्यासारखे वाटते. तर, दुसऱ्या फोटोमध्ये पूनमच्या सोसायटीचा फोटो आहे, ज्यामध्ये अभिनेत्री 16 व्या मजल्यावर राहते असे सांगण्यात आले आहे. एक व्हिडिओ देखील आहे ज्यामध्ये जळालेला भाग जवळून दाखवला आहे.

या पोस्टवर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, 'देवाचे आभार की कुटुंबातील सदस्य आणि त्यांचा पाळीव कुत्रा सुरक्षित आहे.' एकाने लिहिले, 'देवाच्या कृपेने तिथे एक देवदूत (मोलकरीण) होती, जिने कुत्र्याला वाचवले.' तसेच अनेकांनी पूनम पांडेच्या प्रकृतीचीही चौकशी केली.

टॅग्स :पूनम पांडेमुंबईआग