Join us

अखेर रिया चक्रवर्तीने CBI समोर महेश भट यांच्यासोबतच्या नात्याबद्दल तोडली चुप्पी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 14:13 IST

सुशांतच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती आणि महेश भट यांचे फोटो आणि व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि त्यांना खूप ट्रोल करण्यात आले होते. आता या नात्याबद्दलचा खुलासा रियाने सीबीआय चौकशीत केला आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुरूवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सध्या सीबीआय रिया चक्रवर्तीची चौकशी करत आहे.

सुशांत मृत्यू प्रकरणी सीबीआयच्या चौकशी दरम्यान अनेक महत्वाचे खुलासे होत आहेत. रिया चक्रवर्ती आणि दिग्दर्शक-निर्माता महेश भट यांच्यामधील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्यापासून रिया आणि महेश यांच्या नात्याबद्दल सातत्याने बोलले जात आहेत. रियाने आता सीबीआय चौकशीदरम्यान त्या व्हायरल झालेल्या व्हाट्सअॅप चॅटविषयी खुलासा केला आहे.

रियाने सांगितले की, जेव्हापासून महेश भट यांच्याबरोबर काम करत आहे तेव्हापासून महेश भट आणि माझे संबंध खूप चांगले आहेत. ते माझ्यासाठी वडिलांसारखे आहेत. जेव्हा मी सुशांतचे घर सोडले तेव्हा मी त्यांच्याबरोबर व्हाट्सअॅप वरून बातचीत केली होती हे खरे आहे.

 महेश भट हे मला लहान बाळ समजतात आणि मी त्यांना सुरुवातीपासूनच सर बोलते. 8 जून रोजी मी त्यांना म्हटले की मला घराबाहेर काढण्यात आले आहे आणि मी खूप कोलमडून गेली आहे. सर त्याला कळात नाही का मी एवढे दिवस त्याची काळजी घेत आहे. त्याची देखरेख करता करता माझी अवस्था खूप खराब झाली आहे, असं रिया त्या दिवशी महेश भट यांना व्हाट्सअॅपवरून बोलली असल्याचं रियाने सीबीआयला सांगितले आहे. यावेळी सुशांत विषयी बोलताना रिया भावूक झाली होती आणि तिला अश्रू अनावर झाले होते.

टॅग्स :महेश भटरिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूतगुन्हा अन्वेषण विभाग