Join us

अखेर दीया मिर्झा दुसऱ्यांदा अडकली लग्नबेडीत, नवरा वैभव रेखीसोबतचा फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 19:59 IST

अभिनेत्री दीया मिर्झा बिझनेसमन वैभव रेखीसोबत विवाहबंधनात अडकली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा बिझनेसमन वैभव रेखीसोबत विवाहबंधनात अडकली आहे. तिचा लग्नातील लूक नुकताच समोर आला आहे. यावेळी तिने लाल रंगाची बनारसी साडी परिधान केली होती आणि केसात गजरा माळला होता. वधूच्या गेटअपमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.  

अभिनेत्री दिया मिर्झाचे पाली हिल येथील इमारत बेलएअरमध्ये लग्न पार पडले. लग्नानंतर ती आणि तिचा नवरा वैभव रेखी वर-वधूच्या गेटअपमध्ये मीडियासमोर आले होते. दीयाने मीडियाला मिठाई वाटली आणि त्यांचे आभार मानले.

या लग्न सोहळ्याला दीया आणि वैभवच्या जवळच्या लोकांच्या उपस्थितीत झाले. त्यांच्याशिवाय अदिती राव हैदरी, लारा दत्ता आणि जॅकी भगनानी यांनी हजेरी लावली होती.

दीया मिर्झाप्रमाणेच बिझनेसमन वैभव रेखीदेखील विवाहित आहे. तोदेखील पहिल्या पत्नीसोबत काही वर्षांनी विभक्त झाला आहे. वैभव रेखीचे पहिले लग्न योगा इंस्ट्रक्टर सुनयना रेखी सोबत झाले होते आणि त्यांना एक मुलगी आहे. तीदेखील या लग्नाला आली होती.

३९ वर्षीय दीया मिर्झानेदेखील ५ वर्षांनंतर २०१९ ला नवरा साहिल संगासोबत विभक्त झाली होती. 

दीया मिर्झा आणि वैभव रेखी मागील वर्षी कोरोनामुळे जाहिर केलेल्या लॉकडाउनमध्ये त्यांच्यात जवळीक वाढली आणि त्यानंतर ते दोघे वांद्रेमधील घरी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते.

टॅग्स :दीया मिर्झा