Join us
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अनुराग कश्यप-विक्रमादित्य मोटवानीचे रस्ते झाले वेगळे, फँटमला लागले टाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 11:40 IST

फँटमचे नाव ऐकताच अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी, विकास बहल आणि मधु मंटेना यांचे नाव समोर येते.

ठळक मुद्देविक्रमादित्य मोटवानीने ट्वीट करुन या गोष्टीची माहिती दिली आहे

फँटमचे नाव ऐकताच अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी, विकास बहल आणि मधु मंटेना यांचे नाव समोर येते. या प्रॉडक्शनच्या बॅनरखाली अनुराग कश्यपने 'गँग्स ऑफ वासेपुर' सिनेमाची सिरीज तयार केली तर मोटवानीने 'लुटेरा', विकास बहलने 'क्वीन'सारखे सिनेमांचे निर्माती केली आहे. मात्र येणाऱ्या वेळात ते एकत्र दिसतील असे वाटते. या मागचे कारण आहे की यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.     

 

विक्रमादित्य मोटवानीने ट्वीट करुन या गोष्टीची माहिती दिली आहे. विकास, मधु, अनुराग आणि माझी फँटममध्ये असलेली पार्टनरशीप संपली आहे. आतापर्यंतचा आमचा प्रवास शानदार होता. आम्ही एक कुटुंबासारखे राहिलो. सातवर्ष आम्ही एकमेकांना सपॉर्ट केला. मी त्यांना जास्त काही नाही मात्र भविष्यसाठी शुभेच्छा देतो आणि आशा करतो येणाऱ्या वेळात आमचे रस्ते एकमेकांच्या मध्ये येणार नाहीत.      

अनुराग कश्यपने सुद्धा ट्वीट केले आहे की, फँटम एक सुंदर स्वप्न होते आणि प्रत्येक स्वप्नाचा शेवट होत असतो. आम्ही आपलं बेस्ट दिले आहे. आम्ही यशस्वी झालो आणि अपयशी ही झालो. आम्ही एकमेकांना शुभेच्छा देतो. 

फँटमचे पार्टनर्स अनुराग, विकास, मधु मंटेना आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी सात वर्षांपेक्षा जास्त वेळ एकत्र घालवला आहे आणि चांगले सिनेमांदेखील दिले आहे. नुकताच या प्रोडक्शन हाऊसने तापसी पन्नू आणि अभिषेक बच्चन स्टारर मनमर्जियांची निमिर्ती केली होती आणि सिनेमाला चांगला रिस्पॉन्स देखील मिळाला. या चौघांनी मिळून 'लुटेरा' या सिनेमाची पहिली निर्मिती केली होती. यात मुख्य भूमिका रणवीर सिंग आणि सोनाक्षी सिन्हाची होती.    

टॅग्स :अनुराग कश्यपअभिषेक बच्चनतापसी पन्नू