Join us

तोंडावर थुंकला अनिल, तर सनीने दाबला गळा; सिनेमाच्या सेटवर अभिनेत्यांमध्ये झाली तुंबळ हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 17:30 IST

Sunny deol: एकेकाळी सनी देओल आणि अनिल कपूर यांच्यात छान मैत्री होती. मात्र, एका घटनेनंतर या दोघांचं नातं बिघडलं.

आपल्या दमदार अभिनयशैलीमुळे कायम चर्चेत येणारे अभिनेता म्हणजे अनिल कपूर (anil kapoor )आणि सनी देओल ( sunny deol). अभिनयासह हे दोघं त्यांच्या फिटनेसमुळेही कायम चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये आपलं हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या या दोघींनी एका सिनेमात एकत्र काम केलं होतं. मात्र, या सेटवर दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. हे भांडण इतकं टोकाला गेलं की दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. सध्या त्यांच्या वादातील किस्सा चर्चिला जात आहे.

एकेकाळी सनी देओल आणि अनिल कपूर यांच्यात छान मैत्री होती. मात्र, एका घटनेनंतर या दोघांचं नातं बिघडलं. या नात्यात इतकं वितुष्ट आलं की आजही हे दोघं एकमेकांशी फारसं बोलत नाहीत.

नेमका कशामुळे झाला वाद?

सनी आणि अनिल हे दोघं एकाच सिनेमात काम करत होते. या सिनेमात दोघांचा मारामारीचा एक सीन होता. यात सनी देओल रागाच्या भरात अनिल कपूरचा गळा धरतो. तर, अनिल रागारागात त्याच्यावर ओरडतो, असा हा सीन होता. परंतु, या सीनमध्ये अनिल कपूरने काही औरच केलं. खोटा सीन करायचा सोडून अनिल खरोखरच सनीवर जोरजोरात ओरडू लागला. इतकंच नाही तर तो चक्क सनीच्या अंगावर ३-४ वेळा थुंकला. सनी त्याला वारंवार असं करु नकोस म्हणून बजावत होता. मात्र, अनिलने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. परिणामी, संतापलेल्या सनीने अनिलची कॉलर पकडली. त्यानंतर या दोघांमध्ये सेटवरच तुंबळ हाणामारी झाली. याच्यातील वाद इतका वाढला की सेटवरच्या संपूर्ण युनिटला मध्ये पडावं लागलं.

दरम्यान, राम अवतार या सिनेमाच्या शूटवेळी हा किस्सा घडला. यात सनी जाणूनबुजून गळा दाबत असल्याचा आरोप अनिलने केला होता. तर, फाइट मास्तर सांगितल्याप्रमाणे मी काम करत होतो असं सनीने म्हटलं होतं.

टॅग्स :अनिल कपूरसनी देओलसेलिब्रिटीसिनेमा