Join us

SEE PICS: फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्राच्या वडिलांचे निधन, अंत्यदर्शनाला पोहोचले सेलिब्रिटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 15:29 IST

Manish Malhotra's Father Died : बॉलिवूडचा सुप्रसिद्ध फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रा याच्या वडिलांचे आज सोमवारी सकाळी निधन झाले.

ठळक मुद्देकरण जोहर, शबाना आझमी, बोनी कपूर, डेविड धवन, उर्मिला मातोंडकर, पुनित मल्होत्रा यावेळी दिसले.

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रा याच्या वडिलांचे आज सोमवारी सकाळी निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या अंत्ययात्रेत बॉलिवूडचे अनेक दिग्गज सहभागी झालेत. करण जोहर, शबाना आझमी, बोनी कपूर, डेविड धवन, उर्मिला मातोंडकर, पुनित मल्होत्रा असे अनेक यावेळी दिसले.मनीष मल्होत्राच्या वडिलांच्या निधनाची बातमी ऐकताच बॉलिवूडचे अनेक दिग्गज मनीषचे सांत्वन करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले. 

मनीषच्या वडिलांच्या अंत्ययात्रेचे अनेक फोटो समोर आले आहेत. यात मनीष मल्होत्रा शोकाकूल झालेला दिसतोय.  

शबाना आझमी मनीष मल्होत्राच्या घरी पोहोचल्या.

बोनी कपूर यांनीही मनीषचे सांत्वन केले. उर्मिला मातोंडकर ही सुद्धा मनीषच्या घरी पोहोचली.

टॅग्स :करण जोहरबॉलिवूड