Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूख ‘शर्टलेस’ होऊन कॅमेऱ्यापुढे आला रे आला की फराह खानला व्हायची उलटी, मजेशीर आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 08:00 IST

Shah Rukh Khan, Farah Khan : ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील ‘दर्द ए डिस्को’ गाणं शूट करताना अशी झाली होती फराहची अवस्था, मजेशीर आहे किस्सा

शाहरूख खानला (Shah Rukh Khan) बॉलिवूडचा बादशाह म्हटले जाते. गेल्या 30 दशकात शाहरूखने अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. या यादीत 2007 साली रिलीज झालेल्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटाचंही नाव आहे. या चित्रपटाद्वारे दीपिका पादुकोणने बॉलिवूड डेब्यू केला होता. चित्रपटातील दीपिका व शाहरूखची जोडी चाहत्यांना चांगलीच भावली होती. या केमिस्ट्रीची तेव्हा जोरदार चर्चा झाली होती. याशिवाय चित्रपटातील शाहरूखच्या ‘शर्टलेस’ लुकचीही जबरदस्त चर्चा झाली होती. शाहरूखचा शर्टलेस लुक, त्याची किलर बॉडी पाहून तरूणी क्रेझी झाल्या होत्या. पण फराह खानची (Farah Khan ) अवस्था अतिशय वाईट होती. होय, फराह खान जेव्हा केव्हा शाहरूखला शर्टलेस पाहायची तिला ओकारी व्हायची.

फराह खानने ‘ओम शांती ओम’ हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. या चित्रपटातील ‘दर्द ए डिस्को’ हे गाणं तुफान लोकप्रिय झालं होतं. चित्रपटाचं अख्खं शूटींग संपल्यावर हे गाणं शूट करण्यात आलं होतं. या गाण्यात शाहरूखने धमाकेदार डान्स केला होता, शिवाय गाण्यात आपली सिक्स पॅक्ड अ‍ॅब्स बॉडीही फ्लॉन्ट केली होती. ही बॉडी बनवण्यासाठी शाहरूखने दिवसरात्र घाम गाळला होता. या संपूर्ण गाण्यात शाहरूख शर्टलेस दिसला होता. एखाद्या शॉटमध्ये तो शर्ट घालून दिसला तर तोही त्याची संपूर्ण बॉडी दिसावी, या रितीने तो शूट केला गेला होता. या गाण्यातील शाहरूखच्या टोन्ड बॉडीचं चांगलंच कौतुक झालं होतं. पण हे गाणं शूट करताना फराह खानला मात्र वैतागली होती.

होय, गाण्याचं शूटींग सुरू असताना फराह उलट्यांनी बेजार झाली होती. शाहरूख शर्टलेस होऊन कॅमेऱ्यापुढे उभा झाला की, तिला नेमकी ओकारी व्हायची. खुद्द फराहने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. आता शाहरूखच्या शर्टलेस होण्याचा आणि फराहच्या उलट्यांचा काय संबंध? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर फराहने याचं उत्तर दिलं होतं.

ती म्हणाली होती, ‘या गाण्याच्या शूटींगदरम्यान जेव्हा केव्हा शाहरूख शर्ट काढायचा मला उलटी व्हायची. कारण तेव्हा मी प्रेग्नंट होते. मी पूर्णवेळ माझ्या बाजूला एक बकेट घेऊन बसले होते. मी शाहरूखला पाहून उलटी करतेय, असं सर्वांना वाटायचं. पण असं नव्हतं. मी शाहरूखला आधीच सांगितलं होतं. त्याची बॉडी याचं कारण नव्हतं. गाण्यात शाहरूखची बॉडी शानदार होती.’ शाहरूख व फराह हे दोघंही चांगले मित्र आहेत. दोघांची मैत्री बॉलिवूडमध्ये फेमस आहे.

टॅग्स :शाहरुख खानफराह खानबॉलिवूड