Join us

आर माधवनच्या रॉकेट्रीमध्ये SRKला बघून चाहते झाले खूश, ट्विटरवर कौतुकचा वर्षाव, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 16:19 IST

आर. माधवनच्या रॉकेट्री 'द नंबी इफेक्ट' या चित्रपटात शाहरुख खानचा 10 मिनिटांचा केमिओ आहे. SRKचे चाहते ट्विटरवर त्याचं कौतुक करताना थकत नाहीत.

Shahrukh Khan in Rocketry 'The Nambi Effect' : आर माधवनचा रॉकेट्री 'द नंबी इफेक्ट' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पण चित्रपटात एक मोठं सरप्राईज होतं, ज्याचा कोणी विचारही केला नव्हता. या चित्रपटात बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan Cameo Roll in Rocketry)चा कॅमिओ आहे. त्याला सिल्वर स्क्रिनवर  पाहून चाहत्यांनी आनंद गगनात मावत नाहीय.

बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेला शाहरुख खान 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'पठाण' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र त्याआधी त्याने चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. शुक्रवारी रिलीज झालेल्या आर. माधवनच्या रॉकेट्री 'द नंबी इफेक्ट' या चित्रपटात शाहरुख खानची 10 मिनिटांची कॅमिओ केला आहे. 'द नंबी इफेक्ट' या रॉकेट्रीमध्ये किंग खानला प्रेक्षकांनी पाहताच ते आनंदाने नाचू लागले. SRKचे चाहते ट्विटरवर त्याचं कौतुक करताना थकत नाहीत. 

ट्विटरवर शाहरुख खानच्या चाहत्याने लिहिले, शाहरुख खान उपस्थितीमुळे कोणतीही गोष्ट १०० पटीने अधिक चांगली होते.त्याला उगाच किंग खान म्हणत नाहीत. त्याला मोठ्या पडद्यावर पाहून आनंद झाला.

दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले,  शाहरुखचा कॅमिओ शानदार आहे. मग ती भूमिका छोटी असली तरी फरक पडत नाही. चाहत्यांच्या अशा अनेक ट्विटने ट्विटर भरले आहे. 

 

 

 

टॅग्स :शाहरुख खानआर.माधवनबॉलिवूडसेलिब्रिटी