Join us
Daily Top 2Weekly Top 5

"अरे ही तर दुसरी रिया चक्रवर्तीच",सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेचा साडी डान्स पाहून भडकले चाहते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 12:12 IST

या व्हिडिओमध्ये अंकिता ग्रीन साडीमध्ये नाचताना दिसत आहे.'हवा के झोंके' गाण्यावर तिने जबरदस्त ठेका धरल्याचे पाहायला मिळत आहे.

सुशातसिंग राजपूतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे चर्चेत आली. सुशांतला न्याय मिळावा यासाठी अंकिताही झटताना दिसली. सुशांतसिंग राजपूतच्या  निधनाला आता चार महिन्यांहूनही अधिक काळ झाला आहे, दुसरीकडे अभिनेत्री अंकिता लोखंडेही सुशांतमुळे चर्चेत असते.

सुशांतच्या निधनाची बातमी ऐकताच अंकितादेखील दुःखी होती. मात्र हळुहळु अंकिता आता सावरत आहे. सोशल मीडियावरही तिचे हप्पी पोस्ट पाहायला मिळतात.

 

सोशल मीडियावरही ती सक्रिय असून तिचे विविध अंदाजातील व्हिडीओ फोटो शेअर करत ती नेटीझन्सचे लक्ष वेधून घेत असते. 

 अंकिता लोखंडेने  तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता ग्रीन साडीमध्ये नाचताना दिसत आहे.'हवा के झोंके' गाण्यावर तिने जबरदस्त ठेका धरल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमुळे तिची डान्सिंग स्टाईलमुळेही तिच्यावर नजरा खिळल्या आहेत.   या व्हिडिओमध्ये अंकिता लोखंडे खूपच सुंदर दिसत आहेत.

हा व्हिडिओ शेअर करताना अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "साडी डान्स आणि  चांगले संगीत, क्या मेल है". अंकिता लोखंडेच्या  या व्हिडिओवर चाहत्यांकडून बरीच कमेंट्स केली जात आहेत, काहींना हा व्हिडीओ आवडला असला तरी काहींना मात्र तिचा हा व्हिडीओ रूचला नाही. या व्हिडीओ संमिश्र प्रतिक्रीया पाहायला मिळत आहेत.

 

 अंकिता लोखंडे आपल्या करिअरची सुरुवात 'इंडियाज बेस्ट सिनेस्टार खोज' कार्यक्रमातून केली होती. यानंतर, २००९ मध्ये या 'पवित्र रिश्ता' मालिकेतून ख-या अर्थाने अंकिता प्रकाशझोतात आली . या मालिकेनंतर अंकिताला बरीच प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत तिने अभिनेता सुशांतसिंग राजपूतसोबत काम केले. या दोघांची जोडीलाही रसिकांनी तुफान पसंती दिली.  याच मालिकेत काम करता करता प्रेमात पडले आणि त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती. अंकिता लोखंडे 2019 मध्ये कंगना रनौतच्या 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' चित्रपटात दिसली होती.

रिपोर्ट्स : अंकिता लोखंडेला कोर्टात खेचणार रिया चक्रवर्ती?

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रिया अंकिताविरोधात लीगल अ‍ॅक्शन घेऊ शकते. केवळ इतकेच नाही सुशांत प्रकरणात बयानबाजी करणा-या अन्य काही लोकांविरोधातही ती कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. अद्याप रिया व तिच्या वकीलाने याबद्दल कुठलेही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र याआधी रियाच्या वकीलांनी याबद्दलचे संकेत दिले होते. रियाला बदनाम करणा-यांविरूद्ध लवकरच कायदेशीर कारवाई केली जाईल, असे रियाच्या वकीलांनी म्हटले होते.

टॅग्स :रिया चक्रवर्तीअंकिता लोखंडे