Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका पादुकोणचे चाहते झाले नाराज, मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 19:54 IST

दीपिकाच्या चाहत्यांचा अपेक्षाभंग झाला. म्हणून दीपिकाने त्यांची जाहीर माफी मागितली आहे.

यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार नुकताच पार पडला. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार बॉलिवूडची क्यूट गर्लआलिया भटला मिळाला. त्यामुळे दीपिकाचे चाहते नाराज झाले.हा पुरस्कार दीपिकाला मिळावा अशी इच्छा दीपिकाच्या चाहत्यांची होती. मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाला. म्हणून दीपिकाने त्यांची जाहीर माफी मागितली आहे.

दीपिकाच्या एका फॅन पेजवर तिला पद्मावतसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला नाही म्हणून नाराजी व्यक्त करण्यात आली. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (समीक्षक) पुरस्कार रणवीर सिंग आणि आयुषमान खुरानाला विभागून देण्यात आला. मग हा पुरस्कार दीपिका आणि आलियाला विभागून का देण्यात आला नाही? असा सवाल या फॅन पेजवरून विचारण्यात आला. या फॅनपेजवर दीपिकाने स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही, यासाठी मी तुमची माफी मागते. या क्षणापासून मी खूप मेहनत घेईन’ असे तिने म्हटले.

दीपिका पादुकोणचा २०१८मध्ये पद्मावत चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली. इतकेच नाही तर यात दीपिकाने साकारलेल्या राणी पद्मावतीच्या भूमिकेचेही सर्वत्र खूप कौतूक झाले होते.

हा चित्रपटाच्या प्रदर्शनाला करणी सेनेने विरोध केला होता आणि दीपिकाला जीवे मारण्याची धमकीदेखील दिली होती. मात्र दीपिका आपल्या भूमिकेवर ठाम होती. या भूमिकेसाठी दीपिकाने खूप मेहनत घेतली होती.

त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिला हा पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा होती. दीपिकाला या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला नसला तरी तिचा पती रणवीर सिंग याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे दीपिका खूश आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोणफिल्मफेअर अवॉर्डआलिया भटरणवीर सिंगरणबीर कपूर