Join us

सुपरस्टार रजनीकांत यांचा डाय-हार्ड फॅन; उभारलं भव्यदिव्य मंदिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 19:09 IST

एका डाय-हार्ड फॅनने रजनीकांत यांचं थेट मंदिरचं बांधलं आहे. सध्या या अनोख्या मंदिराची चांगलीच चर्चा आहे

अभिनेते रजनीकांत यांनी आपल्या दमदार अभिनय कौशल्यानं फक्त दाक्षिणात्य इंडस्ट्रीत नाही तर बॉलीवूडमध्येही आपली छाप उमटवली आहे. बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्रींबरोबर त्यांनी काम केलं आहे. त्यांचा आता चाहता वर्ग फक्त दक्षिणेत नसून उत्तरपर्यंत आहे. अशाच एका डाय-हार्ड फॅन रजनीकांत यांचं थेट मंदिरचं बांधलं आहे. सध्या या अनोख्या मंदिराची चांगलीच चर्चा आहे.

तामिळनाडूमधील मदुराई येथे एका कार्तिक नावाच्या व्यक्तीने घराच्या आवारात रजनीकांत यांचे मंदिर बांधले आहे. त्या मंदिरात त्याने रजनीकांतचा पुतळा स्थापित केला आहे. रजनीकांतच्या मूर्तीचे वजन 250 किलो आहे. एनआयलाशी बोलताना तो म्हणाला, "आमच्यासाठी रजनीकांत हे देव आहेत. मी त्यांच्याप्रतीचा आदर व्यक्त करण्यासाठी हे मंदिर बांधले आहे'. कार्तिकसोबतच त्याची मुलगीही रजनीकांत यांची चाहती आहे. 

रजनीकांत यांनी अभिनयातून जेवढं त्यांनी नाव कमवलं त्याहून कित्येक पटीने त्यांनी लोकांची मदत करून नाव कमावलं. त्यामुळे तमिळनाडूमध्ये त्यांना देवाचा दर्जा मिळाला आहे. रजनीकांत यांचा चित्रपटांमध्ये जेवढा Larger than life अंदाज पाहायला मिळतो, तेवढेच ते खऱ्या आयुष्यात साधे आहेत. इतके मोठे अभिनेते असूनही, ते अतिशय सामान्य व्यक्तींप्रमाणे आयुष्य जगतात. चाहत्यांना त्यांचा हाच साधेपणा आवडतो.

नुकतेच रजनीकांत यांचा 'जेलर' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरलाय. आता सध्या ते 'थलैवा 170' च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत.   33 वर्षांनंतर या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रजनीकांत एकत्र दिसणार आहेत. याशिवाय ते मुलगी ऐश्वर्याच्या 'लाल सलाम' या चित्रपटातही पाहायला मिळतील.  या चित्रपटात विष्णू विशाल आणि वृकांत मुख्य भूमिकेत आहेत, तर रजनीकांत यांचा कॅमिओ असणार आहे.

टॅग्स :रजनीकांतसेलिब्रिटीसिनेमा