Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध गायक मिका सिंगच्या घशाला इन्फेक्शन, परदेशातील शो रद्द केल्याने कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 09:37 IST

स्वत: केलेल्या चुकांमुळेच ही वेळ आल्याचं त्याने मान्य केलं.

प्रसिद्ध गायक मिका सिंह (Mika Singh) गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. तब्येत खालावल्याने तो परदेशातच अडकला आहे. घशाला इन्फेक्शन झाल्याची माहिती त्याने दिली. यामुळेच त्याला कॉन्सर्ट्समध्ये परफॉर्म करणंही शक्य नाही. परिणामी त्याला तब्बल १५ कोटींच्या नुकसानीलाही सामोरे जावे लागत आहे. स्वत: केलेल्या चुकांमुळेच ही वेळ आल्याचं त्याने मान्य केलं. शरीराला आराम न दिल्याने त्याच्या घशाला गंभीर इन्फेक्शन झाले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मिका सिंह म्हणाला,'माझ्या २४ वर्षांच्या मोठ्या करिअरमध्ये हे पहिल्यांदाच घडत आहे. मला माझे शो पुढे ढकलावे लागले. मी खरंतर तब्येतीबाबतीत नेहमीच सावध राहतो. पण मध्यंतरी अमेरिकेत एकामागोमाग एक शो केल्याने मला आराम मिळाला नाही. परिणामी माझी तब्येत बिघडली.'  

भारतात परत येऊ शकत नाही

४६ वर्षीय मिका सिंह अमेरिकेतील डल्लास येथे परफॉर्म करत होता. दरम्यान त्याचं डोकं दुखू लागलं. घशावरही परिणाम झाला. अशा परिस्थितीत पुढच्या शोसाठी २५ तासांचा प्रवास करुन ऑस्ट्रेलियाला जाता येणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे त्याला भारतात येणंही आता शक्य होत नाहीए.

परदेशातील परफॉर्मन्स रद्दद झाल्याने मीका सिंहला मोठं आर्थिक नुकसान उचलावं लागत आहे. सुमारे १० ते १५ कोटींचं नुकसान झालं आहे. परफॉर्म करता आले नाही म्हणून त्याला पैसे परत द्यावे लागले. काही लोकांनी पाठिंबा देत लिपसिंक करत गाण्याची परवानगी दिली. 

टॅग्स :मिका सिंगबॉलिवूडहिंदी