Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध चित्रपट निर्माते एम. एम. बेग यांचं निधन, आठवडाभर मृतदेह घरातच, दुर्गंध सुटल्यावर शेजाऱ्यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 09:37 IST

Famous Filmmaker M. M. Baig Passed Away: ज्येष्ठ चित्रपट निर्माते एम. एम. बेग यांचं निधन झालं आहे. ते सुमारे ७० वर्षांचे होते. हिंदी चित्रपटांमधील काम आणि बालकलाकार बेबी गुड्डू हिचे वडील म्हणून प्रसिद्ध असलेले बेग हे घरात मृतावस्थेत आढळून आले.

चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकार आणि इतर मंडळींच्या जीवनाचा शेवट एकाकी अवस्थेत झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. अशीच एक हृदयद्रावक  घटना पुन्हा एकदा घडली आहे. ज्येष्ठ चित्रपट निर्माते एम. एम. बेग यांचं निधन झालं आहे. ते सुमारे ७० वर्षांचे होते. हिंदी चित्रपटांमधील काम आणि बालकलाकार बेबी गुड्डू हिचे वडील म्हणून प्रसिद्ध असलेले बेग हे घरात मृतावस्थेत आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूनंतर आठवडाभर त्यांचा मृतदेह घरातच पडू होता. अखेरीस दुर्गंध सुटल्यानं शेजाऱ्यांना या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं.

बेग यांच्या निधनाची माहिती त्यांचे पब्लिस्टिस्ट हनी जावेरी यांनी दिली. हनी जावेरी यांनी दिलेल्या माहितीनुसार बेग हे बऱ्याच काळापासून आजारी होते. तसेच एकटेच राहत होते. गेल्या काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. तसेच मागच्या ४-५ दिवसांपासून ते घराबाहेर पडले नव्हते. त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा उडला. तेव्हा घरामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर या घटनेची माहिती त्यांच्या मुलीला देण्यात आली. तसेच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला. बेग हे खूप चांगले व्यक्ती होते. मी त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी मी प्रार्थना करतो, अशा शब्दात हनी जावेरी यांनी त्यांच्या निधनाची माहिती देताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

एम. एम. बेग यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोकाचं वातावरण पसरलं आहे. ते हिंदी चित्रपटसृष्टीमधील एक प्रख्यात चित्रपट निर्माते होते. आपला शांत स्वभाव आणि चित्रपट निर्मितीप्रति समर्पणासाठी ते प्रसिद्ध होते. ८० आणि ९० च्या दशकामध्ये त्यांची मुलगी बेबी गुड्डू हिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. तसेच ती प्रसिद्ध बालकलाकार होता.  बेग यांनी १९८० आणि १९९० या दशकात हिंदी चित्रपट सृष्टीत महत्त्वाची भूमिका निभावली होती.  

English
हिंदी सारांश
Web Title : Filmmaker M.M. Beg Passes Away; Body Found After Neighbors Alert Police

Web Summary : Veteran filmmaker M.M. Beg, known for his Hindi cinema work and as Baby Guddu's father, died alone. His body was discovered after neighbors reported a foul odor. He was approximately 70 years old and had been unwell for some time. The police are investigating the circumstances.
टॅग्स :बॉलिवूडसिनेमामुंबई