Join us

Fact Check : खरंच नेहा कक्करने लग्नात अनुष्का शर्माला कॉपी केले का? जाणून घ्या व्हायरल सत्य...

By गीतांजली | Updated: January 27, 2021 14:19 IST

Fact Check: Did neha kakkar really copy anushka Sharma at the wedding? नेहाने अनुष्का शर्माची कॉपी केली अशी चर्चा जोरदार आहे..

गेल्या आठवड्यांपासून सोशल मीडियावर बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर  Neha Kakkar आणि रोहनप्रीत सिंगच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. नेहाचा रोका, हळद, मेंहदी आणि संगीत सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. नेहा आणि रोहनप्रीतने 24 ऑक्टोबरला गुरुव्दारामध्ये झालेल्या लग्नादरम्यान अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीला कॉपी केले अशी चर्चा होतोय आहे. ऐवढेच नाही तर दोघांचे विरुष्काच्या आऊटफिटमधले फोटो देखील व्हायरल झाले.  पण यात किती तथ्य आहे किंवा त्यांनी कुणाला कॉपी केलं का? हे जाणून घेऊ....

नेहा आणि रोहनप्रीतने विरुष्काला कॉपी केली असे म्हटलं जाते आहे. पण हे फोटो जर आपण नीट पाहिले तर आपल्या लक्षात येईल की सोशल मीडियावर फिरणारे फोटो मॉफ केलेले आहेत. हा फोटो आपण नीट बघितला तर लक्षात येईल दोनही फोटोंमध्ये मागे उभी असलेली स्त्री सारखीच आहे. ऐवढंच नाही तर विराट आणि रोहनप्रीतच्या हातातील धागादेखील सारखाच आहे.

अनुष्का आणि नेहाच्या गाळ्यातील ज्वेलरीसुद्धा सेम आहे. फोटोत दिसणारे मागचे फुलांचे डेकॉरेशनदेखील सारखेच आहे. यावरुन आपल्या लक्षात आलेच असले की नेहा आणि रोहनप्रीतचे हे फोटो मॉफ करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. म्हणजे त्यांनी विराट-अनुष्काला कॉपी केले असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही.

 

नेहाच्या लग्नातील व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. पण या व्हिडीओ नेहाच्या लेंहग्याचा रंग वेळा असल्याचे आपल्या लगेच लक्षात येते. तिने परिधान केलेली ज्वेलरीसुद्धा वेगळी आहेत. रोहनप्रीतच्या हातात कोणताच धाग नाहीय आणि त्याच्या आऊटफिटचा कलरदेखील विराटपेक्षा खूप वेगळा आहे.. नेहा यावर  तिच्या बाजूने अधिकृत वक्तव्य कधी करते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.  

टॅग्स :नेहा कक्करअनुष्का शर्माबॉलिवूड