बहुप्रतिक्षित 'बॉर्डर २' चित्रपटातील 'घर कब आओगे' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. या गाण्यात वरुण धवनच्या अभिनयाची सोशल मीडियावर जास्त चर्चा झाली. अनेक नेटकऱ्यांनी यावरून त्याला ट्रोल केले आणि त्यावर विविध मीम्स देखील बनवले. आता या ट्रोलिंगवर स्वतः वरुण धवनने अतिशय मजेशीर आणि सकारात्मक पद्धतीने भाष्य केले आहे.
सोशल मीडियावरील मीम्सवर वरुणची प्रतिक्रिया
'बॉर्डर २' चित्रपटाच्या ‘ब्रेव्स ऑफ द सॉईल’ (Braves of the Soil) या विशेष ट्रिब्यूट ट्रेलर लॉन्च इव्हेंट दरम्यान, वरुण धवनने ट्रोलर्सना अतिशय शांतपणे आणि समंजसपणे उत्तर दिले आहे. ट्रेलर लॉन्च वेळी वरुण म्हणाला, "मी नकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी माझं कामच बोलेल, यावर अधिक विश्वास ठेवतो. मला असं वाटतं की, ट्रोलिंगसारख्या या गोष्टी तर सुरूच राहतात, त्याने काही फरक पडत नाही. मी या गोष्टींसाठी काम करत नाही."
आपल्या कामाबद्दल आत्मविश्वास व्यक्त करताना तो पुढे म्हणाला, "मी चित्रपट का करतोय, आणि मी कशासाठी मेहनत घेतली आहे, हे तुम्हाला या शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर समजेलच. मला माझ्या चित्रपटावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही एक उत्तम चित्रपट बनवला आहे." यापूर्वी सोशल मीडिया लाइव्ह दरम्यानही त्याने थट्टा-मस्करीच्या अंदाजात ट्रोलर्सना उत्तर दिले होते. तो म्हणाला होता, "सध्या संपूर्ण हिंदुस्थान माझ्यासोबत हसतोय." 'बॉर्डर २' चित्रपट २३ जानेवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Web Summary : Varun Dhawan addressed 'Border 2' trolling with humor and confidence. He focuses on his work, trusting the film will speak for itself upon release, January 2026.
Web Summary : वरुण धवन ने 'बॉर्डर 2' की ट्रोलिंग का हास्य और आत्मविश्वास के साथ जवाब दिया। उन्होंने अपने काम पर ध्यान केंद्रित किया, उन्हें विश्वास है कि फिल्म जनवरी 2026 में रिलीज होने पर खुद बोलेगी।