Join us

हेमा मालिनींनी लेकीला दिला मोलाचा सल्ला; घटस्फोटानंतर ईशा म्हणाली, "आयुष्यात रोमान्स..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 09:47 IST

मला आईने हेच सांगितलं की 'भले तू करोडपतीशी लग्न केलंस तरी...'

बॉलिवूडचे 'हिमॅन' अभिनेते धर्मेंद्र आणि 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी यांची लेक ईशा देओलने (Esha Deol) सिनेसृष्टीत कमबॅक केलं आहे. तिचा 'तुमको मेरी कसम' सिनेमा रिलीज होत आहे. ईशा आर्थिकरित्या सक्षम आहे. आई हेमा मालिनी यांनीच मुलींना सर्वतोपरी सक्षम बनवलं आहे. गेल्या वर्षीच ईशाचा घटस्फोट झाला. तेव्हा हेमा मालिनी यांनी ईशाला काय शिकवण दिली याचा खुलासा तिने केला आहे.

ईशा देओलने नुकतीच 'द क्विंट'ला मुलाखत दिली. ती म्हणाली, "मला वाटतं प्रत्येक आई आपल्या मुलींना त्यांची वेगळी ओळख बनवण्याची शिकवण देते. माझ्याही आईने मला तेच शिकवलं आणि तसंच घडवलं. तू मेहनत कर, नाव कमव आणि तुझं एक प्रोफेशन ठरव हेच तिने मला नेहमी सांगितलं. तुझं भलेही नाव झालं नाही तरी तुझं एक प्रोफेशन नक्कीच असलं पाहिजे. ते कधीच सोडू नको. प्रयत्न करत राहा आणि काम करत राहा."

ईशा पुढे म्हणाली, "मला आईने हेच सांगितलं की 'भले तू करोडपतीशी लग्न केलंस तरी तू स्वत: आर्थिकरित्या सक्षम असलं पाहिजे. जेव्हा एखादी महिला आर्थिकरुपाने स्वतंत्र होते तेव्हा ती खूप वेगळी असते. आपण आयुष्यात बऱ्याच गोष्टी करतो. काम करतो, स्वत:ची काळजी घेतो पण रोमान्स मागेच राहतो. आयुष्यात रोमान्स कधीच संपला नाही पाहिजे. रोमान्समुळेच तुम्हाला पोटात फुलपाखरं उडल्यासारखं वाटतं. ही तीच भावना आहे जी आपल्या सर्वांनाच अनुभवायची असते.' मला तिचा तोच सल्ला डोक्यात राहिला पण मी अद्याप तो अंमलात आणलेला नाही."

टॅग्स :इशा देओलहेमा मालिनीबॉलिवूड