Join us

Drishyam 3 : मोठी अपडेट! 'दृश्यम ३'साठी अजय देवगणने ठेवली 'ही' मोठी अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 16:39 IST

Drishyam 3 : होय, येत्या काळात 'दृश्यम'चा तिसरा पार्ट अर्थात 'दृश्यम ३' प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. याच चित्रपटाबद्दल एक मोठे अपडेट आहे.

Drishyam 3 Update: 'दृश्यम' आणि 'दृश्यम २' हे अजय देवगणचे ( Ajay Devgn) दोन्ही सिनेमे ब्लॉकबस्टर ठरलेत. अलीकडे आलेल्या 'दृश्यम २' या सिनेमानं तर ३५० कोटींवर कमाई केली. साहजिकच 'दृश्यम ३'ची तयारी सुरू झाली आहे.  येत्या काळात 'दृश्यम'चा तिसरा पार्ट अर्थात 'दृश्यम ३' प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. याच चित्रपटाबद्दल एक मोठे अपडेट आहे. हाेय, 'दृश्यम ३'बद्दल अजयने म्हणे एक मोठा निर्णय घेतला आहे.

तुम्हाला ठाऊक आहेच की, अजयचे 'दृश्यम' आणि 'दृश्यम २' हे दोन्ही सिनेमे मोहनलाल स्टारर मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे. म्हणजे आधी मल्याळम भाषेत 'दृश्यम' आणि 'दृश्यम २' हे दोन चित्रपट तयार झालेत. यानंतर हिंदीत याच नावाचे रिमेक बनवले गेलेत. पण यावेळी मात्र असं न करता मल्याळम आणि हिंदी दोन्ही सिनेमे एकत्रच शूट होणार आहेत. 

होय,'दृश्यम 3' चं हिंदी आणि मल्याळम भाषेतील शूटिंग एकाच वेळेस केलं जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामागे अजयची कल्पना आहे. ,'दृश्यम 3' रिलीज होईल तेव्हा तो हिंदी प्रेक्षकांसाठी फ्रेश रहावा, हा त्यामागचा उद्देश आहे.

अनेकदा रीमेक रिलीज होतो, तेव्हा प्रेक्षकांनी आधीच त्याचं ओरिजनल व्हर्जन पाहिलेलं असतं. साहजिकच रिमेकमधला प्रेक्षकांचा इंटरेस्ट काहीसा कमी होतो. याचा फटका सिनेमाच्या कमाईला बसतो. हे टाळण्यासाठी 'दृश्यम 3'चे मल्याळम आणि हिंदी हे दोन्ही व्हर्जन एकाचवेळी शूट करण्याचा मेकर्सचा प्लान आहे. जेणेकरून हिंदी प्रेक्षकांना फ्रेश सिनेमा बघायला मिळेल. चर्चा खरी मानाल तर अजयनं अशी अट ठेवल्यामुळे निर्मात्यांना आता हा निर्णय घेणं भाग पडतंय.

अजय देवगण सध्या भोला या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. या चित्रपटातही अजय व तब्बूची जोडी दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि चाहत्यांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया यावर पहायला मिळाल्या. सिनेमा ३० मार्च,२०२३ रोजी रिलीज केला जाणार आहे.  

टॅग्स :अजय देवगणदृश्यम 2